जम्मू आणि काश्मीरमधील भाजपाचे अध्यक्ष रविंदर रैना यांनी मंगळवारी पूंछ जिल्ह्यात निवडणूक सभेदरम्यान ‘द्वेषपूर्ण भाषण आणि असंसदीय भाषा वापरल्याबद्दल’ पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याची हकालपट्टी केली आहे. पूंछ जिल्हा हा अनंतनाग-राजौरी लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे. जिथे २५ मे रोजी लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात मतदान होणार आहे. अनंतनाग-राजौरी लोकसभा मतदारसंघातून पीडीपी अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते मियाँ अल्ताफ यांच्यात चुरशीची लढत आहे. याशिवाय या जागेवरील अन्य १९ प्रमुख उमेदवारांमध्ये डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पार्टी (DPAP) चे मोहम्मद सलीम परे आणि जम्मू आणि काश्मीर अपनी पार्टीचे नेते जफर इक्बाल खान मन्हास यांचा समावेश आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

६ वर्षांसाठी पक्ष सदस्यत्वातून हकालपट्टी

रैनाने पूंछ जिल्ह्याचे प्रवक्ते सतीश भार्गव यांना असंसदीय भाषा आणि द्वेषपूर्ण भाषण केल्याबद्दल सहा वर्षांसाठी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वातून काढून टाकण्याचे आदेश दिलेत. जम्मू-काश्मीर भाजपा प्रमुखांनी पक्षाच्या शिस्तपालन समितीचे अध्यक्ष सुनील सेठी यांच्या शिफारशीच्या आधारे हा आदेश दिला. सेठी यांनी पूंछ जिल्ह्यातील मेंढर भागातील एका सभेत भार्गव यांनी धमकावणारी भाषणे आणि असंसदीय भाषा वापरल्याच्या व्हिडीओचा संदर्भ दिला होता.

भाजपासारख्या शिस्तप्रिय पक्षात अनुशासनहीनता खपवून घेतली जाऊ शकत नाही

सुनील सेठी यांच्या वतीने सांगण्यात आले की, हे अत्यंत निषेधार्ह आहे, ज्येष्ठ नेत्याचे असे वर्तन घोर निराशाजनक आहे आणि भाजपासारख्या शिस्तप्रिय पक्षात ते खपवून घेतले जाऊ शकत नाही. त्यांची सहा वर्षांसाठी पक्षातून तत्काळ हकालपट्टी करण्यात यावी, अशी शिफारस करण्यात आली आहे. सेठी म्हणाले, त्यांच्या वर्तनाची गंभीर नोंद घेण्यात आली असून, या प्रकरणात चौकशीची गरज नाही.

काय म्हणाले सतीश भार्गव?

भाजपाच्या पहाडी सेलचे प्रवक्ते भार्गव यांनी मंगळवारी जिल्हा विकास परिषदेचे सदस्य वाजिद बशीर टिकू यांच्या कार्यालयात पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित केले. आगामी निवडणुकीत NC आणि PDP यांना पाठिंबा देत असलेल्या पहाडी नेत्यांनी आता पंतप्रधान नरेंद्र मोदींना मतदान केले पाहिजे. मोदी सरकारने त्यांना अनुसूचित जमातीच्या यादीत समाविष्ट करण्याचे आपले वचन पाळले आहे, याचीही सतीश भार्गव यांनी आठवण करून दिली. जर तुम्ही असे केले नाही, तर तुम्हाला १९४७ मध्ये झालेल्या जखमा दिल्या जाऊ शकतात,” असंही ते म्हणालेत.

भार्गव कशाचा संदर्भ देत होता?

ऑगस्ट १९४७ मध्ये स्वातंत्र्यानंतर काही दिवसांनी जेव्हा जम्मू आणि काश्मीरचे शासक महाराजा हरी सिंह यांनी भारत किंवा पाकिस्तानबरोबर जायचे की नाही हे अद्याप ठरवले नव्हते, तेव्हा त्यांनी जम्मू आणि काश्मीरमध्ये सैन्य पाठवले होते. त्यांनी मीरपूर, मुझफ्फराबाद, भिंबर, गिलगिट, स्कार्डू इत्यादींसह विस्तीर्ण प्रदेश ताब्यात घेतले, त्यावेळी मोठ्या संख्येने लोक मारले आणि त्यातील हिंदूंची संपत्ती लुटली गेली. त्यानंतर अनेक हिंदूंनी सुरक्षिततेसाठी इतर भागात विशेषतः पुंछ आणि राजौरीमध्ये स्थलांतर केले. त्यानंतर शांतता प्रस्थापित होण्यापूर्वी या भागात हिंदू आणि रहिवासी मुस्लिम यांच्यात मोठ्या प्रमाणात संघर्ष आणि दंगली झाल्या. त्यात किती ठार झाले आणि किती जखमी झाले याबद्दल ठोस आकडेवारी नाही. उच्च कर आकारणी आणि डोगरा सैन्याच्या कथित हस्तक्षेपाने हरी सिंह यांनी बंडखोरी चिरडल्यानंतर पुंछ आणि मीरपूरमध्ये देखील हिंसाचार उफाळून आला, ज्यामध्ये मोठ्या संख्येने हिंदू, मुस्लिम आणि शीख मारले गेले. हिंसाचारानंतर या भागातील मुस्लिमांनी मोठ्या संख्येने पाकिस्तानात स्थलांतर केले. अखेरीस २६ ऑक्टोबर १९४७ रोजी हरी सिंह यांनी भारतीय संघराज्याबरोबरइंस्ट्रूमेंट ऑफ एक्सेशनवर स्वाक्षरी केली.

‘मुस्लिमांना लक्ष्य करून धमकावण्याच्या घटना घडल्या’

दरम्यान, पीडीपीने भाजपाकडून लोकांना आपल्या पक्षाच्या उमेदवाराला मतदान करण्यास भाग पाडण्यासाठी धमकी दिल्याचे सांगत मतदारसंघ रिटर्निंग ऑफिसरकडे भाजपाच्या विरोधात तक्रार दाखल केली. पीडीपी नेते आणि माजी विधान परिषद आमदार फिरदौस टाक यांनी त्यांच्या तक्रारीत म्हटले आहे की, “आमच्या लक्षात आले आहे की, पहाडी मुस्लिमांना त्यांच्या मतदानाच्या निवडीवर प्रभाव पाडण्याच्या उद्देशाने धमकावण्याच्या घटना चिंताजनक आहेत. विशेषतः भाजपाचे प्रतिनिधी उघडपणे पहाडी मुस्लिमांना धमक्या देत आहेत. संघ परिवाराने पाठिंबा दिलेल्या उमेदवाराला मतदान केले नाही, तर १९४७ च्या घटनांची पुनरावृत्ती होऊ शकते, अशा आशयाच्या धमक्या दिल्याचे सांगितले जात आहे.

हेही वाचाः मतदारसंघाचा आढावा : माढा; मोहिते-पाटील आणि भाजपची प्रतिष्ठा पणाला

अनंतनाग-राजौरीमधील पहाडी मतदान किती महत्त्वाचे?

राजौरी आणि पूंछ जिल्ह्यांतील एकूण ७.३५ लाख मतदारांपैकी ४ लाखांहून अधिक पहाडी लोक आहेत. सीमांकनानंतर पूंछ जिल्हा आणि राजौरीचा दोन तृतीयांश भाग जम्मू लोकसभा मतदारसंघाच्या बाहेर आहे आणि अनंतनाग-राजौरीचा भाग झाला आहे. मतदारसंघातील काश्मीर भागातील मतदार १०.९४ लाखांहून अधिक आहेत. जम्मू भागातील मतदारांची संख्या जास्त आहे. खरे तर बदललेल्या सीमांकनामुळे काश्मीरमधील अनंतनाग-राजौरी मतदारसंघात भाजपा उमेदवार देण्याची अपेक्षा होती. काश्मीरमध्ये कधीही एकही जागा जिंकलेली नसल्यामुळे येथील विजय पक्षाला मोठा दिलासा देणारा ठरला असता. भाजपाच्या अनुपस्थितीत पहाडी नेते त्यांच्या पूर्वीच्या पक्षांशी निष्ठा जाहीर करीत आहेत. मुख्यत: मुफ्ती आणि नॅशनल कॉन्फरन्सचे मियां अल्ताफ यांच्यातील स्पर्धा तीव्र आहे.

हेही वाचाः हिंदुत्ववादी महिला असदुद्दीन ओवेसींचा गड भेदणार का?

भार्गवच्या वक्तव्यावर काय प्रतिक्रिया होती?

खरं तर भार्गव यांचा या प्रदेशात फारसा प्रभाव नाही. २०१८ मध्ये जेव्हा त्यांनी मेंढरच्या गोहलाद नगर पंचायतीमधील एका प्रभागासाठी निवडणूक लढवली होती, तेव्हा त्यांना फक्त १४ मते मिळाली होती. परंतु सीमांकनानंतर बदललेली राजकीय समीकरणे पाहता अनंतनाग-राजौरी ही जम्मू आणि काश्मीरमधील लोकसभेची सर्वात महत्त्वाची जागा झाली आहे. सीमांकनातील बदल विशेषत: आपल्या विजयात बाधा आणण्यासाठी केले गेले आहेत, असा आरोपही पीडीपीने केला आहे. मंगळवारी भार्गवच्या द्वेषपूर्ण भाषणाचा व्हिडीओ टॅग करून त्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why did bjp expel a leader from poonch for making hate speech in jammu and kashmir vrd