आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री तथा वायएसआरसीपी पक्षाचे सर्वेसर्वा जगनमोहन रेड्डी यांची बहीण वायएस शर्मिला लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. नुकतेच तेलंगणाची विधानसभा निवडणूक झाली. या निवडणुकीत काँग्रेसने बाजी मारली. याच निवडणुकीदरम्यान शर्मिला यांनी काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला होता. तेलंगणा राष्ट्र समितीच्या पराभवासाठी मतांचे विभाजन रोखणे गरजेचे आहे. त्यामुळे आमचा पक्ष काँग्रेसला पाठिंबा देणार आहे, असे त्यावेळी शर्मिला म्हणाल्या होत्या. त्यानंतर आता त्या लवकरच काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश करणार आहेत.

वायएसआरसीपीमध्ये सामील होण्यास नकार

शर्मिला या आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वायएसआर रेड्डी यांची कन्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून वायएसआरसीपी पक्षाचे खासदार वाय व्ही सुब्बारेडी आणि शर्मिला यांच्यात बोलणी सुरू होती. मात्र ही चर्चा आता निष्फळ ठरली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार जगनमोहन रेड्डी यांनीच सुब्बारेड्डी यांना चर्चेसाठी शर्मिला यांच्याकडे पाठवले होते. शर्मिला यांनी वायएसआरसीपीमध्ये प्रवेश करावा, असा प्रस्ताव जगनमोहन रेड्डी यांनी शर्मिला यांच्यासमोर ठेवला होता. मात्र शर्मिला यांनी तो अमान्य केला. शर्मिला यांनी अन्य पक्षात प्रवेश केल्यास आंध्र प्रदेशमध्ये माझ्या प्रतीमेवर परिणाम पडेल, असे जगनमोहन रेड्डी यांना वाटत होते, असे सांगितले जात आहे.

dispute between mahayuti is not solved in Nandurbar Shinde group still away from campaigning
नंदुरबारमध्ये महायुतीतील वाद मिटेनात, शिंदे गट अजूनही प्रचारापासून दूर
solapur lok sabha 2024 marathi news
सोलापूरमध्ये चुरस वाढली, उभय बाजूने आक्रमक प्रचार
BJP tukde-tukde gang Kanhaiya Kumar interview delhi lok sabha election
“मी तुकडे-तुकडे गँगचा असेन तर मोदी मला अटक का करत नाहीत?”; कन्हैयाचं भाजपाला आव्हान
Chaudhary Birendra Singh from Haryana rejoined Congress
हरियाणामध्ये भाजपला धक्का; प्रभावी जाट नेते ब्रिजेंद्र सिंह यांची काँग्रेसमध्ये घरवापसी

२०२१ नंतर भाऊ-बहीण दूर

३१ डिसेंबर २०२३ रोजी शर्मिला आणि सुब्बारेड्डी यांच्यात बैठक झाली होती. याच बैठकीत शर्मिला यांनी वायएसआरसीपीमध्ये सामील होण्यास नकार दिल्याचे म्हटले जात आहे. शर्मिला यांनी त्यांच्या स्वत:चा वाएसआरटीपी हा पक्ष काढला होता. त्यानंतर जुलै २०२१ मध्ये जगनमोहन रेड्डी आणि शर्मिला एकमेकांपासून दूर झाले होते.

जगनमोहन यांनी घेतली वडिलांची जागा

शर्मिला यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यास आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत जगनमोहन रेड्डी आणि शर्मिला हे एकमेकांचे राजकीय विरोधक होण्याची शक्यता आहे. २००९ साली वायएसआर यांचे निधन झाल्यानंतर जगनमोहन आणि शर्मिला यांच्यात अनेक मुद्द्यांवर मतभेद झाले. पुढे जगनमोहन रेड्डी यांनी त्यांच्या वडिलांची जागा घेतली. आंध्र प्रदेशमधील पक्षाची सर्व कामे ते पाहू लागले. याच काळात शर्मिला या राष्ट्रीय राजकारणात सक्रिय होत्या.

शर्मिला होणार काँग्रेसचा चेहरा?

शर्मिला यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यास आंध्र प्रदेशच्या राजकारणात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. शर्मिला काँग्रेसमध्ये सामील झाल्यास त्यांना राष्ट्रीय काँग्रेसचे सरचिटणीसपद दिले जाण्याची शक्यता आहे किंवा त्यांना राज्यसभेत खासदारकीही दिली जाऊ शकते. त्या लवकरच काँग्रेसच्या हायकमांडची भेट घेऊन येत्या ४ जानेवारी रोजी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.

आंध्र प्रदेश काँग्रेसकडून स्वागत

शर्मिला यांचे आंध्र प्रदेशच्या नेत्यांनी स्वागत केले आहे. त्या आमच्या पक्षात येत असतील तर त्यांचे स्वागतच आहे, असे आंध्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिडिगू रुद्रराजू म्हणाले.

राजकीय समीकरण बदलणार

शर्मिला यांनी अद्याप कोणतीही निवडणूक लढवलेली नाही. मात्र सुरुवातीच्या काळात वायएसआरसीपीच्या प्रगतीत त्यांचा मोठा वाटा राहिलेला आहे. त्यामुळे शर्मिला यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर आंध्र प्रदेश तसेच तेलंगणा राज्यातील राजकीय समीकरण बदलणार आहे.