05 March 2021

News Flash

मोटारीची कंटेनरला धडक लागून दोघांचा मृत्यू ; दोन तरुणी जखमी

निगडी टोलनाक्याजवळ रविवारी पहाटे तीनच्या सुमारास मोटारीची कंटेनरला धडक लागून झालेल्या अपघातामध्ये वैद्यकीय महाविद्यालयाच्या एका तरुणीसह दोघांचा मृत्यू झाला असून दोन तरुणी गंभीर जखमी

| June 24, 2013 02:55 am

निगडी टोलनाक्याजवळ रविवारी पहाटे तीनच्या सुमारास मोटारीची कंटेनरला धडक लागून झालेल्या अपघातामध्ये वैद्यकीय महाविद्यालयाच्या  एका तरुणीसह दोघांचा मृत्यू झाला असून दोन तरुणी गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सूरज सुरेंद्र छाब्रा (वय २४, रा. अजमेरा कॉलनी, पिंपरी), तन्वी सुनील म्हात्रे (वय २४, रा. अलिबाग, रायगड) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. तर करिश्मा शेलवाणी (रा. मुंबई) आणि रश्मी त्रिपाठी (रा. सुरत) या जखमी आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तन्वी, करिश्मा आणि रश्मी या डीवाय पाटील महाविद्यालयात वैद्यकीय शाखेच्या तिसऱ्या वर्षांला शिकत आहेत. सूरज हा व्यावसायिक आहे. शनिवारी हे सर्व जण कामाच्या निमित्ताने सूरजच्या मोटारीतून बाहेरगावी गेले होते. पुणे-मुंबई महामार्गावरून पुण्याकडे येत असताना निगडी टोलनाक्याजवळ त्यांच्या मोटारीची कंटेनरला जोराची धडक लागली. यामध्ये सूरजाचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. तर तन्वीचा रविवारी दुपारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. दोघींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक महेश ढवाण हे अधिक तपास करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 24, 2013 2:55 am

Web Title: 2 killed and 2 injured in accident near nigdi toll naka
Next Stories
1 नाटय़ परिषद पुणे शाखेची कार्यकारिणी बिनविरोध?
2 गुणवत्ता राखण्यासाठी अधिकाऱ्यांची भूमिका महत्त्वाची – राजेंद्र दर्डा
3 दांडेकर पुलाजवळील संरक्षक भिंत पडल्याप्रकरणी अभियंत्याला अटक
Just Now!
X