01 March 2021

News Flash

ट्रकमधून १८ लाख रुपयांची वेलची लंपास

अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल झाला आहे.

वाहनचालकांमध्ये खळबळ; अज्ञात चोरट्यांवर गुन्हा

पुणे- बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर पारगाव (ता. खंडाळा) गावच्या हद्दीत खंबाटकी बोगदा ओलांडल्यावर चहा पिण्यासाठी एका चहाच्या टपरीवर थांबलेल्या ट्रकमधून अज्ञात चोरट्यांनी अठरा लाख रुपयांच्या वेलदोड्या चोरल्याचा अज्ञात चोरट्यांविरोधात खंडाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पुणे- बेंगलोर राष्ट्रीय माहामार्गावर पारगाव (ता. खंडाळा) गावच्या हद्दीत चहाच्या टपरी लगत नागेश पुटटे गवडा (वय ४५ रा. यशवंतपुर, बेंगलोर) हा ट्रकचालक ट्रक क्रमांक (एमएच ४८ बीएम. ५९७९) दि. ७ ते ८ सप्टेंबर २०२० च्या दरम्यान वेलदोड्याचे बॉक्स घेऊन बेंगोलरहून भिवंडीला जात होते.
पारगाव (ता. खंडाळा )गावच्या हद्दीत चहाच्या टपरीजवळ थांबवला असता बेंगलोर ते खंडाळा दरम्यान अज्ञात चोरट्यांनी ट्रकच्या मागील दरवाज्याचे लॉक तोडून १८ लाख रुपये किंमतीची ५० किलोचे ३६ बॉक्स असे अठराशे किलो वेलदोडे चोरून नेल्याची तक्रार खंडाळा पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. या घटनेमुळे ट्रक चालकांमध्ये खळबळ उडाली असून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल झाला आहे.उपनिरीक्षक पवार अधिक तपास करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 24, 2021 12:23 am

Web Title: truck cardamom theft crime on unknown thieves akp 94
Next Stories
1 हडपसर आणि रामटेकडी येथील कचरा प्रकल्पास भीषण आग
2 हडपसर औद्योगिक वसाहतीमधील कचरा प्रकल्पास भीषण आग
3 शिवसेना, भाजपा अन् हिंदुत्व… सुशीलकुमार शिंदेंनी मांडलं रोखठोक मत
Just Now!
X