08 March 2021

News Flash

‘फिरती पाणपोई’ उपक्रमाचा उपनगरात विस्तार

एक महिन्यापूर्वी रिक्षा पंचायतीच्या वर्धापन दिनी फिरती पाणपोई हा नावीन्यपूर्ण उपक्रम सुरू करण्यात आला.

फिरती पाणपोई वितरण प्रसंगी अश्विनी कदम, नितीन पवार, नितीन कदम, पप्पू बनसोडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

दीड हजारांवर थल्यांतून थंडगार पाण्याचे वाटप; उपक्रमाचे सर्व स्तरांतून स्वागत

एक महिन्यापूर्वी रिक्षा पंचायतीच्या वर्धापन दिनी फिरती पाणपोई हा नावीन्यपूर्ण उपक्रम सुरू करण्यात आला. तत्कालीन वाहतूक पोलीस उपायुक्त सारंग आवाड यांनी पाणी थंड करणारी थली रिक्षाला बांधून या उपक्रमाचे उद्घाटन केले होते. पुणेकरांनी या उपक्रमाचे जोरदार स्वागत केले असून पुण्यातील विविध मंडळे, संस्था आणि लोकप्रतिनिधींनीही त्यांच्या भागातील रिक्षाचालकांना थंड पाण्याच्या पिशव्या वाटण्याचा उपक्रम सुरू केला आहे. अरण्येश्वर, सहकारनगर भागातील सामाजिक कार्यकत्रे नितीन कदम आणि नगरसेविका अश्विनी कदम यांनी त्यांच्या परिसरातील ३०० रिक्षांमध्ये फिरत्या पाणपोईची सोय नुकतीच करून दिली. या रिक्षाचालकांना रिक्षा पंचायतीचे निमंत्रक नितीन पवार यांच्या हस्ते पाण्याच्या पिशव्यांचे वितरण करण्यात आले. फिरत्या पाणपोईंची संख्या वाढत असून सुमारे दीड हजारांवर फिरत्या पाणपोया तहानलेल्यांची तृष्णा शांत करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 26, 2016 5:00 am

Web Title: water service
Next Stories
1 अभ्यास दौऱ्यांच्या नावाखाली करदात्यांच्या पैशाची उधळपट्टी!
2 पुढच्या वर्षी पाऊस पडला नाही तरी पाणी पुरेल असे नियोजन – गिरीश बापट
3 पायाने उत्तरपत्रिका.. अन् प्रथम श्रेणी
Just Now!
X