प्रवेश मिळूनही ७ हजार ४७० विद्यार्थ्यांची प्रवेशाकडे पाठ

पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात राबवण्यात येत असलेल्या अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेच्या दुसऱ्या फे रीत ७ हजार ६५० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. तर ७ हजार ४७० विद्यार्थ्यांनी प्रवेशाकडे पाठ फिरवली.

के ंद्रीय अकरावी ऑनलाइन प्रवेश नियंत्रण समितीद्वारे ३१५ कनिष्ठ महाविद्यालयातील प्रवेशासाठीची ऑनलाइन प्रक्रिया सुरू आहे. प्रवेश प्रक्रियेच्या दुसऱ्या फे रीत १५ हजार ९६७ विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर करण्यात आला होता. प्रवेशासाठी सोमवारची मुदत देण्यात आली होती. या मुदतीत प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांपैकी ७ हजार ६५० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. त्यात कला शाखेतील ९८२, वाणिज्य शाखेत ३ हजार ९९, विज्ञान शाखेत ३ हजार २७६ आणि व्यवसाय अभ्यासक्रमाला २९३ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला.  तर  ७ हजार ४७० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला नाही. २५ विद्यार्थ्यांना प्रवेश रद्द के ला, ५२ विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात आला. याच दरम्यान ६४४ विद्यार्थ्यांनी राखीव जागांद्वारे प्रवेश घेतले, अशी माहिती प्रवेश समितीने दिली.

प्रवेश प्रक्रियेच्या तिसऱ्या फे रीच्या वेळापत्रकानुसार आतापर्यंतच्या प्रवेश फेऱ्यांमध्ये सहभागी न झालेल्या विद्यार्थ्यांना ९ सप्टेंबपर्यंत नोंदणी करून प्रवेश अर्जाचा भाग एक आणि भाग दोन भरता येईल. प्रवेश अर्जाच्या भाग एकची पडताळणी करून घेता येईल. तर भाग एक भरलेल्या विद्यार्थ्यांंना भाग दोनमध्ये बदल करता येईल.

प्रवेश अर्जाचा भाग दोन भरून अर्ज अंतिम (लॉक) के लेल्या विद्यार्थ्यांनाच तिसऱ्या फेरीत प्रवेश जाहीर करण्यात येणार आहे. १३ सप्टेंबरला प्रवेश यादी जाहीर करण्यात येईल. प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांंना १३ ते १५ सप्टेंबर दरम्यान महाविद्यालयात प्रवेश निश्चित करता येईल.