पुणे : मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्रीवर विवाहाच्या आमिषाने बलात्कार केल्याप्रकरणी सोलापूरमधील एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेला आरोपी विराज रविकांत पाटील याच्या वडिलांची एकेकाळी सोलापूर शहरात दहशत होती. सोलापूरमधील भडकलेल्या टोळीयुद्धात रविकांत उर्फ रवी पाटील याच्याविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल झाले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

याप्रकरणी विराज रविकांत पाटील (वय ३५, रा. राॅयल पाल्म, सोरेगाव, सोलापूर) याच्याविरुद्ध बलात्कार, तसेच शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका ३२ वर्षीय अभिनेत्रीने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणी माॅडेलिंग करते. तिने मराठी चित्रपटात काम केले आहे. अद्याप चित्रपट प्रदर्शित झालेला नाही. समाजमाध्यमातून तिची विराज पाटीलशी ओळख झाली होती. दोघे एकमेकांच्या संपर्कात आले. पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेऊन विवाह करणार असल्याचे आमिष विराजने अभिनेत्रीला दिले होते.

हेही वाचा : बालेवाडी परिसरातील वेश्या व्यवसायावर छापा, सात राज्यातील दहा मुलींची सुटका

त्यानंतर त्याने अभिनेत्रीला जाळ्यात ओढले. त्याने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर विराजने अभिनेत्रीशी संपर्क कमी केला, तसेच तिने विवाहाबाबत विचारणा सुरू केल्यानंतर त्याने टाळाटाळ सुरू केली. त्यानंतर ती विराजला प्रत्यक्ष भेटली. माझ्याशी संपर्क का तोडला? अशी विचारणा तिने केली. तेव्हा विराजने तिच्यावर पिस्तूल रोखले. मी विवाह करणार नाही. पोलिसांकडे गेली तर मी कोण आहे, हे तुला दाखवितो, अशी धमकी त्याने दिली. त्याने तिला धक्काबुक्की केली. महिला पोलीस उपनिरीक्षक चौधरी तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Allegation of rape on marathi film actress in solapur pune print news rbk 25 pbs
First published on: 27-01-2024 at 16:33 IST