पुण्याच्या कासारसाई धरणाच्या पाण्यात मधोमध पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार अडकले होते. तराफ्यावर बसून मत्स्य व्यवसायाची पाहणी करायला गेले असताना तराफ्याचे इंजिन अचानक बंद पडले. अखेर दुसऱ्या बोटीत रवानगी केल्यानंतर त्यांची सुटका झाली.

घडलं काय?


पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार कासारसाई धरणावर गेले होते. तराफ्यावर बसून मत्स्य व्यवसायाची पाहणी करत होते. यावेळी अचानक तराफ्याचं इंजिन बंद पडलं. चालकानं इंजिन सुरु करण्याचे प्रयत्न केले, पण ते सुरु होईना. शेवटी जवळच असलेली बोट बोलावण्यात आली. त्यानंतर अजित पवार दुसऱ्या बोटीत बसले आणि पुढचा प्रवास सुरु झाला.

two Children Drown While Swimming, Surya River, palghar taluka, One Rescued, two dead Body Found , two Children Drown in Surya River, palghar news, Drown news,
सूर्या नदीत दोघांचा बुडून मृत्यू; एकाला वाचवण्यात यश
environmentalist initiative to fill dry water bodies for wildlife
उरण : वाढल्या उन्हाच्या झळा, वन्यजीवांसाठी भरला पाण्याचा तळा
Stop on black market of water action will be taken against those who demand money for tankers
पाण्याच्या काळ्या बाजाराला बांध, टँकरसाठी पैसे मागणाऱ्यांवर कारवाई होणार
three workers died due to electric shock
अंबरनाथ: विजेच्या धक्क्याने तीन कामगारांचा मृत्यू, जांभूळ जल शुद्धीकरण केंद्रातील घटना

पुण्याच्या मावळ तालुक्यात कासारसाई धरण आहे. तिथं बऱ्यापैकी मत्स्यव्यवसाय सुरू आहे. त्याचीच माहिती घेण्यासाठी पालकमंत्री अजित पवार सकाळी सात वाजताच पोहोचले होते. धरणाच्या मध्यभागी पिंजरा लावण्यात आलेला होता. तिथं जाण्यासाठी तराफा अथवा बोटीच्या साह्याने जायचं होतं. संबंधित मालकांनी पवार यांना तराफ्यावर घेऊन जायचं नियोजन आखलं होतं. गाडीतून अजित पवार उतरताच त्यांना याची कल्पना देण्यात आली.

तेव्हाच गरजेपेक्षा जास्तीचे लोक त्यावर घेऊ नका, अशी सूचना त्यांनी केली होती. मात्र तरीही उपस्थितांनी तराफ्यावर गर्दी केली आणि तराफ्यावरचं वजन जास्त झाल्याने इंजिनवर ताण आला. त्यामुळे इंजिन बंद पडून तराफा मध्येच अडकला होता. पाहणी झाल्यानंतर जेव्हा ते परतले, तेव्हा त्यांनी घडल्या प्रकारावर मिश्किल टिप्पणीही केली. इथलं पर्यटन म्हणजे भलतीच कसरत आहे, असं ते म्हणाले.