पुणे : मेट्रोचे साहित्य चोरणाऱ्या तीन महिलांसह पाच जणांना चतु:शृंगी पोलिसांनी पकडले. त्यांच्याकडून मेट्रोचे चोरलेले साहित्य जप्त करणात आले. अनिल सुजान काळे (वय १८), दीपक मारूती काळे (वय २५, रा. थेरगांव) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत सुरेश लावंडे (वय २३) यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. लावंडे मेट्रोमध्ये पर्यवेक्षक आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बाणेर, बालेवाडी परिसरातील मेट्राे खांबासाठी लागणाऱ्या लोखंडी पट्ट्या आरोपी काळे यांनी चोरुन नेल्या होत्या. दोघे जण ओैधमधील ज्युपिटर रुग्णालयाच्या परिसरातील एका भंगार माल दुकानात लोखंडी पट्ट्या विक्री करण्यासाठी आले होते. पोलिसांना याबाबतची माहिती मिळाल्यानंतर दोघांना पकडण्यात आले.

हेही वाचा >>>शरद पवारांच्या मध्यस्थीनंतरही शिरूर मतदारसंघाचा तिढा सुटेना? विलास लांडेंच्या वक्तव्यानंतर चर्चेला पुन्हा सुरुवात

दरम्यान, चतु:शृंगी पोलिसांनी मेट्रो साहित्याची चोरी केल्या प्रकरणी तीन महिलांना अटक केली. अटक करण्यात आलेल्या गणेशखिंड रस्त्यावर आचार्य आनंदऋषीजी चौकात सुरू असलेल्या मेट्रोच्या कामाच्या ठिकाणावरुन सळई, नट असे साहित्य महिलांनी चोरले होते. पोलिसांनी तीन महिलांना अटक केली असून त्या जुन्या मुंबई-पुणे रस्त्यावरील पाटील इस्टेट वसाहतीत राहायला आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Five people including three women arrested for stealing metro material rbk 25 amy
Show comments