गणेशोत्सव मिरवणुकीत उडत्या चालीच्या गाण्यांना अधिक मागणी

गणरायाची दहा दिवस यथासांग पूजाअर्चा केल्यानंतर गणेश मंडळांना आता विसर्जन मिरवणुकांचे वेध लागले आहेत. बुधवारी आणि गुरुवारी निघणाऱ्या विसर्जन मिरवणुकांसाठी यंदाही उडत्या चालींच्या गाण्यांची मागणी कायम राहणार आहे. अजय-अतुलच्या ‘सैराट’फेम    झिंगाट’ गाण्याने सगळीकडे धुमाकूळ घातला असून मिरवणुकीत नाचण्यासाठी सर्वाधिक मागणी त्याच गाण्याला राहणार आहे. याशिवाय, ‘शांताबाई’, ‘कांताबाई’, ‘रिक्षावाला’, ‘पारू’ आदींसह नव्याने आलेले ‘सुया घे, पोत घे’, अशा गाण्यांची ‘मोस्ट वॉन्टेड’मध्ये गणना राहील, असे चित्र आहे.

man was stabbed to death in a fight between two groups in nagpur
नागपुरातली गुन्हेगारी थांबेना… आता दोन गटांच्या भांडणात एकाची भोसकून हत्या…
Mumbai, Two arrested,
मुंबई : वृद्धाचे सोने लुटणाऱ्या दोघांना अटक
Ram Navami, High Court, State Govt,
रामनवमीला खबरदारी घ्या! उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश
Sujay Vikhe Patil, terror-mongers,
दहशत माजविणाऱ्यांना चोख उत्तर द्या – डॉ. सुजय विखे पाटील

गणेशोत्सवात विशेषत: विसर्जन मिरवणुकांमध्ये ठराविक पद्धतीची, उडत्या चालीची आणि नृत्याची कला अवगत नसणाऱ्यांनाही मनसोक्त ठेका धरायला लावेल, अशा गाण्यांची फर्माईश जास्त असते. अमिताभ स्टाइल हात वर करून ‘मैं हूँ डॉन’ असो की भगवानदादांप्रमाणे हलकेच कंबर हलवणारे ‘भोली सुरत दिल के खोटे’ गाणे असो, अशा गाण्यांची ‘गणपती डान्स’मध्ये कायम चलती राहिलेली आहे. गेल्या काही वर्षांतील गाण्यांचा आढावा घेतल्यास, ‘बिलनची नागीन निघाली’, ‘जवा नवीन पोपट हा’ या गाण्यांनी एक काळ गाजवला होता. त्याचप्रमाणे ‘मी बाबुराव बोलतोय’, ‘गुबू गुबू वाजतंय, ‘ऐका दाजीबा’, ‘बयेचं डोकं फिरलया’, कोंबडी पळाली, ‘गोरी-गोरी मांडवात आली’, ‘नदीच्या पल्याड आईचा डोंगर’, ‘वाजले की बारा’, ‘नाच रे मोरा’, ‘मुंगळा-मुंगळा’, ‘बांगो-बांगो’, ‘काँटा लगा’, ‘जुम्मा-जुम्मा’, अशा अनेक गाण्यांनी मिरवणुका गाजवल्या आहेत. अलीकडच्या काळात ‘वाट बघतोय रिक्षावाला’, ‘शांताबाई’, ‘कांताबाई’, ‘पप्पी दे पारूला’, ‘आवाज वाढव डीजे’ अशा गाण्यांनी कहर केला आहे. एप्रिलमध्ये प्रदर्शित झालेल्या सैराट चित्रपटातील या सर्वाना मागे टाकले. गणेशोत्सवापूर्वीच या गाण्याने देशविदेशात कल्ला केला. अनेक ठिकाणी ‘झिंगाट’नेच सेलिब्रेशन होते. विसर्जन मिरवणुकांत कोणत्या गाण्यांची चलती राहील आणि कोणते गाणे सर्वात भाव खाईल, याचे अंदाज बांधले जात आहेत.