पुणे : नगर रस्त्यावर सुरू असलेले मेट्रोचे काम, उड्डाणपुलाच्या कामामुळे कोंडी होत आहे. जड वाहनांमुळे वाहतूक विस्कळीत होत असल्याने नगर रस्त्यावर गर्दीच्या वेळेत अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळता जड वाहनांना प्रायोगिक तत्त्वावर बंदी घालण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अग्निशमन दलाची वाहने, रुग्णवाहिका, पीएमपी बस, खासगी बस, तसेच अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळून जड वाहनांना नगर रस्त्याचा वापर करण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. नगर रस्त्यावर दुतर्फा डंपर, सिमेंट मिक्सर, जेसीबी, रोड रोलर अशी अवजड वाहने लावण्यास मनाई करण्यात आली आहे.

हेही वाचा…पुणे : गणेशखिंड रस्त्यावरील शिवनेरी बस वाहतूक पर्यायी मार्गाने

पुणे-नगर रस्त्यावरील वाघोली परिसरातील वाघेश्वर चौक, वाघोली ते खराडी बाह्यवळण मार्गावर सकाळी सात ते दहा आणि सायंकाळी पाच ते रात्री नऊ यावेळेत अवजड वाहनांना बंदी राहणार आहे. केसनंद रस्त्यावरील वाघोली ते शिवाजी चौक ते केसनंद गाव रस्त्यावर जड वाहनांना सकाळी सात ते दहा आणि सायंकाळी पाच ते रात्री नऊ यावेळेत बंदी राहणार आहे.

हेही वाचा…पुणे : मार्केट यार्डात ट्रक चालकाला चाकूच्या धाकाने लूटणारा गजाआड

लोहगाव ते वाघोली ते धानोरी या मार्गावर जड वाहनांना सकाळी सात ते दहा आणि सायंकाळी पाच ते रात्री नऊ यावेळेत जड वाहनांना बंदी घालण्यात येणार आहे. पुणे-नगर रस्त्यावरील वाघेश्वर चौक, वाघोली ते लोणीकंद रस्त्यावर सकाळी सात ते दहा आणि सायंकाळी पाच ते रात्री नऊ यावेळेत जड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Heavy vehicles banned on pune nagar road during rush hours due to metro and flyover construction pune print news rbk 25 psg
First published on: 20-02-2024 at 13:57 IST