scorecardresearch

… इथे काल घरे होती असे आता वाटतच नाही – राजनाथ सिंह

माळीण गावात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेचे चित्र ह्रदयविदारक असून, मदत आणि पुनर्वसनासाठी राज्य सरकारला हवी असलेली सर्वोतोपरी मदत करण्यास केंद्र सरकार तयार असल्याचे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी सांगितले.

… इथे काल घरे होती असे आता वाटतच नाही – राजनाथ सिंह

माळीण गावात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेचे चित्र ह्रदयविदारक असून, मदत आणि पुनर्वसनासाठी राज्य सरकारला हवी असलेली सर्वोतोपरी मदत करण्यास केंद्र सरकार तयार असल्याचे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी सांगितले. राजनाथ सिंह यांनी गुरुवारी सकाळी माळीणमध्ये येऊन घटनास्थळाची पाहणी केली. त्याच्यासोबत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे, स्थानिक खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, पुण्याचे खासदार अनिल शिरोळे हेदेखील होते. घटनास्थळाची पाहणी केल्यावर राजनाथ सिंह यांनी ही खूपच गंभीर नैसर्गिक दुर्घटना असल्याचे स्पष्ट केले. इथे एक गाव होते, असे आता वाटतच नाही, असे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले, माळीणबद्दल समजल्यावर कालच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला इकडे जाण्यास सांगितले. काल रात्रीच मी इथे येणार होतो. मात्र, इथे लाईटची सोय नसल्याने रात्री भेट देणे सुयोग्य नसल्याचे मला सांगण्यात आले. त्यामुळे आज सकाळी मी इथे आलो आहे. इथे काल सकाळपर्यंत घरे होती, मंदिर होते, असे आता वाटतच नाही. ४७ घरे मातीच्या ढिगाऱयाखाली दाबली गेली असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून मला सांगण्यात आले. राज्य सरकार, जिल्हा प्रशासन आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (एनडीआरएफ) उत्तर प्रकारे काम करीत आहेत. त्यांना सर्व मदत करण्यास केंद्र सरकार तयार आहे. या घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधानांनी प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत बुधवारीच जाहीर केली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-07-2014 at 12:45 IST

संबंधित बातम्या