पुणे : निवडणुकीच्या तोंडावर शहरात सलग चार गोळीबाराच्या घटना घडल्या. त्यानंतर बिबवेवाडी भागात मध्यरात्री टोळक्याने दहशत माजवून वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली. तोडफोड प्रकरणात अल्पवयीन मुले सामील झाल्याचे उघडकीस आले आहे. टोळक्याने एक मोटार, चार रिक्षांची तोडफोड केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

याबाबत धोंडीराम महादेव रावळ (वय ५३) यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी सहा ते सातजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरात गेल्या आठवड्यात गोळीबाराच्या सलग चार घटना घडल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गुरुवारी मध्यरात्री टोळक्याने बिबवेवाडी भागात कोयते उगारून दहशत माजविली. टोळक्याने एक मोटार, चार रिक्षांच्या काचा फोडल्या, तसेच रस्त्यात लावलेल्या दुचाकींना धक्का देऊन पाडल्या.

हेही वाचा…पुण्यात ३०२ क्रमांकाच्या खोलीत वेश्याव्यवसाय; पोलिसांनी टाकला छापा, ३ तरुणींची सुटका

या घटनेमुळे परिसरात घबराट उडाली आहे. एकमेकांकडे पाहण्याच्या वादातून टोळक्याने तोडफोड केल्याची माहिती मिळाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असून, तिघांना ताब्यात घेतले. तोडफोडीत अल्पवयीन मुले सामील असल्याची माहिती मिळाली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune gang vandalized vehicles in bibwewadi and unleashed terror with koyta pune print news rbk 25 psg