पिंपरी-चिंचवड : पुणे शहरापाठोपाठ पिंपरी-चिंचवड शहरातदेखील मेफेड्रोन अमली पदार्थ आढळले आहे. सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रक्षक चौकात अज्ञात व्यक्तीकडून दोन कोटी दोन लाख रुपयांचे दोन किलो ३८ ग्रॅम मेफेड्रोन जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी नमामी झा नावाच्या व्यक्तीला सांगवी पोलिसांनी अटक केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – पुण्यात अघोषित पाणीकपातीला सुरुवात : येत्या बुधवारी ‘या’ भागातील पाणी बंद

हेही वाचा – धक्कादायक! इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांचा व्हिडीओ वापरुन व्यावसायिकाची दहा लाखांची फसवणूक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज पहाटे पाचच्या सुमारास पिंपळे निलख परिसरातील रक्षक चौकात अज्ञात व्यक्ती हा पांढरी पिशवी घेऊन संशयितरीत्या थांबला असल्याची माहिती सांगवी पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच तत्काळ सांगवी पोलिसांनी सापळा रचून आरोपी नमामी झा याला अटक केली आहे. झा याच्याकडे २ कोटी २ लाखांचे दोन किलो मेफेड्रोन ड्रग्स मिळाले असून जप्त करण्यात आले आहे. या ड्रग्स प्रकरणाला मोठी व्याप्ती असण्याची शक्यता पिंपरी-चिंचवड पोलिसांनी व्यक्त केली आहे. आरोपी झा कोणाला मेफ्रेड्रोन ड्रग्स देणार होता? त्याच्या पाठीमागे कोण आहे? याचा देखील सखोल तपास पिंपरी-चिंचवड पोलीस करत आहेत

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mephedrone drug worth rs 2 crore found in pimpri chinchwad the accused was arrested kjp 91 ssb
Show comments