scorecardresearch

स. प. महाविद्यालयाच्या आवारात झाड कोसळून एकाचा मृत्यू

सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या आवारात झाड कोसळून एकाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी घडली.

स. प. महाविद्यालयाच्या आवारात झाड कोसळून एकाचा मृत्यू
(प्रातिनिधिक छायाचित्र)

पुणे : सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या आवारात झाड कोसळून एकाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी घडली. मालसिंग पवार (वय ५०, रा. जनता वसाहत, पर्वती) असे मृत्युमुखी पडलेल्यांचे नाव आहे. पवार स. प. महाविद्यालयाच्या आवारातील मुलांच्या वसतीगृहाच्या परिसरात वाढलेले गवत कापण्यासाठी पवार सकाळी साडेअकराच्या सुमारास गेले होते. त्या वेळी अचानक झाड कोसळले. झाडाच्या फांद्या पवार यांच्या अंगावर पडल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती विश्रामबाग पोलिसांनी दिली.

पवार मूळचे सोलापूरचे आहेत. त्यांना महाविद्यालयाच्या आवारातील मुलांच्या वसतीगृहातील गवत कापण्याचे काम देण्यात आले होते. या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.

मराठीतील सर्व पुणे न्यूज ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: One died tree fell college premises children hostel area pune print news ysh

ताज्या बातम्या