लोणावळा: बंगल्याच्या प्रारंगणात रात्री उशिरापर्यंत बेकायदेशीर साउंड सिस्टम लावून मुलींकडून अश्लील नृत्य करून घेणाऱ्या आणि नृत्य करणाऱ्या नृत्यांगनावर लोणावळा पोलिसांनी कारवाई केली आहे. या प्रकरणी लोणावळा पोलिसांनी नऊ जनांवर कारवाई करत त्यांना ताब्यात घेतलं आहे. या कारवाईमुळे लोणावळ्यात बंगले भाड्याने देणाऱ्या मालकांचे धाबे दणाणले आहेत. तसा इशारा लोणावळा पोलिसांनी ही दिला आहे. बंगला भाड्याने देताना याबाबत ची माहिती पोलिसांना देणे बंधनकारक आहे. अन्यथा बंगला मालकांवर देखील कारवाई केली जाणार आहे. असा इशारा सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी दिला आहे.

आणखी वाचा-कार्यालयीन जागा सहकार्यात पुणे देशात आघाडीवर

लोणावळ्यात अवघ्या देशात नागरिक येत असतात. मुंबई, पुणे येथील अनेक नागरिक वास्तव्यास देखील आहेत. तर, अनेक जण बंगला भाड्याने घेऊन लोणावळ्यातील पर्यटनाचा आनंद घेत असतात. परंतु, बंगला भाड्याने घेऊन अनेक जण बेकायदेशीर कृत्य करत असल्याचं वारंवार समोर येत आहे. लोणावळ्यातील तुंगार्ली येथे बंगला भाड्याने घेऊन नृत्यांगनाकडून अश्लील हावभाव करून नाच करवून घेणाऱ्या व्यक्तींसह नऊ जणांना लोणावळा पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. रात्री उशिरापर्यंत साउंड सिस्टीमवर गाणे वाजवून इतरांची झोप मोड करणाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे. लोणावळा आणि परिसरातील बंगले भाड्याने देताना बेकायदेशीर कृत्य होणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे असून याबाबत ची माहिती पोलिसांना देणे बंधनकारक आहे. अन्यथा बंगला मालकांवर कारवाई करण्यात येईल असा इशारा सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी दिला आहे.