राज्यातील जातीनिहाय जनगणना करण्याचा ठराव राज्य मागासवर्गीय आयोगाच्या बैठकीत आज घेण्यात आला आहे. पुण्यातील बैठकीत या संदर्भातील हा ऐतिहासिक निर्णय़ झाला आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मागासवर्गीय आयोगाने हा मोठा निर्णय घेतला आहे.

या ठरावानुसार प्रशासकीय यंत्रणा वापरून जनगणना करण्यासाठी सरकारकडे ठराव सादर केला जाणार आहे. राज्य मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष आनंद निरगुडेंच्या अध्यक्षतेतील बैठकीत हा निर्णय झाला आहे.

राज्याच्या मागासवर्ग आयोगाची बैठक पुण्यातील व्हीव्हीआयपी सर्कीट या ठिकाणी पार पडली. जवळपास दुपारी १२ वाजता सुरू झालेली ही बैठक साधारण अडीचतास चालली. ११ सदस्य या बैठकीस हजर होते. त्यानंतर ऐतिहासिक निर्णय यामध्ये घेण्यात आलेला आहे व जनगणने संदर्भातील ठराव मंजूर करण्यात आलेला आहे. हे सर्व शासनासमोर मांडला जाणार आहे.

ओबीसींच्या राजकीय आरक्षणा संदर्भातील निर्णयानंतर बराच वाद देखील झाला होता. त्यानंतर ही समिती गठीत करण्यात आली होती. या समितीची पहिलीच बैठक आज पुण्यात पार पडली व त्यामध्ये हा मोठा निर्णय घेण्यात आला.