Rupali Patil Thombare on Ravindra Dhangekar : पुण्यात एका अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत भरदाव वेगाने पोर्श कार चालवत एका दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील एक तरुण आणि एका तरुणीचा मृत्यू झाला आहे. या अपघातानंतर काही तासांनी आरोपीला जामिनावर मुक्त करण्यात आलं. त्यामुळे राज्यभरातून संतापाची लाट उसळली आहे. काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर या प्रकरणावरून पोलीस प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांना धारेवर धरण्याचा प्रयत्न करत आहेत. ते सातत्याने गृह विभाग, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, पुण्याचे पालकमंत्री अजित पवार आणि पुणे पोलिसांच्या कारभारावर प्रश्न उपस्थित करत आहेत. दरम्यान, आमदार धंगेकर यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना हात पाय बांधून पळायला लावलं आहे, अशी टीका केली होती. धंगेकरांच्या या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवार गटातील नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. रुपाली ठोंबरे यांनी फेसबूकवर यासंदर्भात एक पोस्ट लिहून धंगेकरांना राजकारण न करता पुण्यासाठी काम करण्याचं आवाहन केलं आहे.
“फडणवीसांनी अजित पवारांचे हात पाय बांधून…”, पुणे अपघातानंतरच्या कारवाईवरून धंगेकरांची टीका; रुपाली ठोंबरे प्रत्युत्तर देत म्हणाल्या…
रुपाली ठोंबरे यांनी त्यांच्या फेसबूक पोस्टमध्ये म्हटलं आहे की, आमदार रवींद्र धंगेकरजी, देवेंद्र फडवणीस यांनी अजित पवारांचे हातपाय बांधले, असं तुम्ही बोलून गेलात. परंतु, आम्ही तुमच्या या वक्तव्याचा निषेध करतो.
Written by पॉलिटिकल न्यूज डेस्क
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 26-05-2024 at 23:26 IST
© IE Online Media Services (P) Ltd
© IE Online Media Services (P) Ltd
TOPICSअजित पवारAjit Pawarदेवेंद्र फडणवीसDevendra Fadnavisपुणे अपघातPune Accidentपुणे न्यूजPune Newsभारतीय राष्ट्रीय काँग्रेसIndian National Congress
+ 1 More
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rupali patil thombare reply to ravindra dhangekar criticizing ajit pawar over pune accident asc