अतिशय गरीब कुटुंबातील ऋतुजा प्रकाश आमले ही दहावीच्या परीक्षेत ९९.६० गुण मिळवून उत्तीर्ण झाली. पण परिस्थिती अभावी शिक्षण सोडून देण्याच्या विचारात असणाऱ्या ऋतुजाचं शैक्षणिक पालकत्व खासदार अमोल कोल्हे यांनी स्वीकारत तिच्या पंखास बळ दिलं आहे. आमलेवाडी, बोतार्डे, तालुका. जुन्नर येथील ऋतुजा प्रकाश आमले हिनं हलाखीच्या परिस्थितीसोबत झगडत दहावीच्या परिक्षेत तब्बल ९९.६० गुण मिळवलं. डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहिलेल्या ऋतुजाला अमोल कोल्हे यांनी स्वप्न पूर्ण करण्यासाठी बळ दिलं आहे.

खासदार आमोल कोल्हे यांनी सोशल मीडियावर याबाबतची माहिती दिली आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. ‘डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहणारी आमलेवाडी, बोतार्डे, तालुका. जुन्नर येथील ऋतुजा प्रकाश आमले ही दहावीच्या परीक्षेत ९९.६० गुण मिळवून उत्तीर्ण झाली. अतिशय गरीब कुटुंबातील ऋतुजाच्या पंखास बळ देण्याबाबतचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्याला प्रतिसाद देत ‘जगदंब प्रतिष्ठान’च्या वतीने तिचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारले’, असं अमोल कोल्हे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

या निर्णयामुळे अमोल कोल्हे यांच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ट्विटर खात्यावरही त्यांचं याबाबत कौतुक केलं आहे. इतकंच नाही तर करोनामुळं ऑनलाइन शिक्षण पद्धती सुरू झाल्यानं ऋतुजाच्या शिक्षणात कोणताही अडथळा येऊ नये यासाठी तिला एक अॅन्ड्राइड मोबाइल ‘जगदंब प्रतिष्ठान’च्या वतीनं भेट म्हणून देण्यात आला आहे.

private schools within one km of govt schools not obligated to have rte seats
वर्गभेद निर्माण करणारा शिक्षण हक्क!
Electricity Contract Workers, maharashtra, Promised Age Relaxation, Permanent Jobs, Yet to Be Fulfilled, nagpur, electricity workers, marathi news, devendra fadnavis,
कंत्राटी वीज कामगारांना वयात सवलतीचे आश्वासन ठरले ‘जुमला’ !
Career MPSC exam Guidance UPSC job
प्रवेशाची तयारी: व्यवस्थापन शिक्षणासाठी राज्यस्तरीय सीईटी
High Court relief
वैद्यकीय विषयाच्या विद्यार्थ्याला उच्च न्यायालयाचा दिलासा, पुनपर्रीक्षेची गुणपत्रिका देण्याचे राज्य शिक्षण मंडळाला आदेश