भारतातील मत्स्य पुराण फार जुने आहे. आज आम्ही खवय्यांसाठी एक खास रेसिपी आणली आहे, या रेसिपीचं नाव आहे माशांच्या अंड्यांचे ऑमलेट. ही मत्स्यप्रेमींसाठी खास डिश आहे. ही डिश सगळ्यात फेमस आहे. ती तुम्ही नाश्त्यासाठी, एखाद्या पार्टीसाठी वापरू शकता. स्टार्टर म्हणूनही तिचा वापर करता येईल. चला तर मग पाहुयात माशांच्या अंड्यांचे ऑमलेट रेसिपी..

माशांच्या अंड्यांचे ऑमलेट साहित्य

१. माशांचे अंडे पावकिलो
२. तिन चार कोंबडीचे अंडे
३. तेल किंवा तूप,कांदे
४. टोमॅटो, मीठ, हळद
५. कोथिंबीर, जीरे धणे पावडर
६. लाल तिखट

माशांच्या अंड्यांचे ऑमलेट कृती

१. माशांचे अंडी स्वच्छ धुवून घ्या, मोकळे करून कुस्करून घ्या..कोबंडीची अंडी फोडून एका भांड्यात टाका, त्यात कांदे टोमॅटो वगैरे सर्व मसाले टाकून सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्या.

२. कोंबडीच्या अंड्यांच्या ऐवजी बेसन पीठ ही वापरु शकता.. सर्व मसाले तेच राहतील.

३. एका कढईत तूप किंवा तेल टाकून जसे आपणं नॉर्मल ऑमलेट करतो तसे टाकून परतून घ्या.

४. मंद गॅसवर ठेवावे आपली माशांचे अंडी कच्ची आहेत ती व्यवस्थित शिजून आली पाहिजे.

हेही वाचा >> घरीच बनवा चटपटीत “फिश पास्ता”! हॉटेलसारखा यम्मी आणि सुपरहेल्दी…ही घ्या एक झकास रेसिपी

५. जर आपल्याला माशांचे अंडे शिजवून वापरायचे असतील तर वापरु शकता..आपले स्वादिष्ट पौष्टिक माशांच्या अंड्यांचे ऑमलेट तयार आहे.

रेसिपी कुकपॅडवरुन साभार.