पास्ता म्हणजे अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत प्रत्येकाच्या आवडीचा पदार्थ. म्हणूनच तर मुलांसाठी प्रत्येक घरातल्या आईला पास्ता रेसिपी शिकावीच लागते. मात्र तुम्ही कधी फिश पास्ता रेसिपी ट्राय केली आहे का? चला तर मग आज एक आगळी वेगळी आणि भन्नाट रेसिपी पाहुयात. चला तर मग फिश पास्ता कसा बनवायचा जाणून घेऊयात…

फिश पास्ता साहित्य

१. ४ बाउल शिजवलेला पास्ता
२. २ माशाचे तुकडे
३. १ बारीक चिरलेला कांदा
४. १ बारीक चिरलेला टोमॅटो
५. ५-६ लसूण पाकळ्या
६. १ इंच आले बारीक तुकडे करून
७. २ टेबलस्पून टोमॅटो सॉस
८. १.५ टेबलस्पून शेजवान चटणी
९. १ टेबलस्पून चिली फ्लेक्स
१०. मीठ चवीनुसार
११. २ टेबलस्पून तेल

फिश पास्ता कृती

१. सर्वप्रथम पास्ता शिजवून घ्यावा

२. त्यानंतर टोमॅटो कांदा लसुण यांची पेस्ट करून घ्यावी

३. आता माशाचे तुकडे आणि बारीक काप करून घ्यावेत काटे असतील तर ते काढून घ्यावेत आता कढईमध्ये तेल घालून कांदा टोमॅटोची पेस्ट घालून घ्यावी आणि त्यात लाल तिखट हळद घालून घ्यावी मीठ चवीनुसार घालून घ्यावे आणि त्यात माशाचे बारीक केलेले काप घालावेत.

४. आता हे सर्व चांगले हलवून घ्यावे आणि शिजू द्यावे मसाला चांगला शिजला नंतर त्यात वाफवलेले पास्ता घालून घ्यावा

५. हा पास्ता चांगले एकजीव करून घ्यावा आणि आवडत असल्यास त्यात मेओनेज घालू शकतो.

हेही वाचा >> ओल्या सोड्याचे कटलेट; संध्याकाळच्या नाश्त्यासाठी सोपी रेसिपी, मुलंही आवडीनं खातील

६. अशा पद्धतीने तयार आहे आपला फिश पास्ता

रेसिपी कुकपॅडवरुन साभार.