Wheat Kheer Recipe: खीर म्हंटल की, आपल्या सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय. जेवणाच्या ताटात गोड पदार्थाची वाटी दिसली की, मन अगदीच तृप्त होऊन जाते. तुम्ही आतापर्यंत रव्याची खीर, तांदळाची खीर, शेवयाची खीर नक्कीच खाल्ली असेल. पण, तुम्ही कधी गव्हाची खीर खाल्ली आहे का ? नाही… तर आज आपण गव्हाची खीर कशी बनवायची हे पाहणार आहोत.

साहित्य –

पाव किलो गहू

१० ग्रॅम चण्याची डाळ

ओलं खोबरं (बारीक तुकडे केलेलं)

वेलची, जायफळ

काजू, बदाम

तूप

दूध

हेही वाचा…रात्री उरलेल्या भाताचे काय करायचं असा प्रश्न पडलाय ? मग ‘हा’ पदार्थ बनवून पाहा; झटपट होणारी रेसिपी लगेच नोट करा

कृती –

गहू भाजून घ्या. त्यानंतर ते मिक्सरला बारीक करून घ्या.

बारीक करून घेतलेलं गहू थोडा वेळ (१५ मिनिटे) पाण्यात ठेवा.

त्यानंतर गॅसवर एक टॉप ठेवा त्यात तीन तांबे पाणी घाला व चांगलं उकळवून घ्या.

नंतर उकळलेल्या पाण्यात गव्हाचे मिश्रण, चण्याची डाळ, ओलं खोबरं, वेलची, जायफळ घाला.

मिश्रण थोडं शिजलं की त्यात गूळ घाला.

खीर भांड्याला लागू नये म्हणून सतत त्याला हलवत रहा.

खीर शिजली की, तुमच्या आवडीनुसार काजू, बदाम तुम्ही घालू शकता.

अशाप्रकारे तुम्ही गव्हाची खीर तयार.

खीर खाताना त्यात तूप आणि दूध घालून खा ; म्हणजे ही गव्हाची खीर आणखीन चविष्ट लागेल.