दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणात ठरलेले पदार्थ म्हणजे वरण-भात आणि पोळी भाजी. पण, कधी तरी ऑफिसवरून येताना मित्र-मैत्रिणींबरोबर खायला जायचा प्लॅन झाला की, मग घरात बनवलेलं जेवणं उरते. मग दुसऱ्या दिवशी पोळीचा चिवडा किंवा उरलेल्या भाताला फोडणी देऊन त्याचे सेवन करण्यात येते. पण, नेहमी फोडणीचा भात बनवण्यापेक्षा आज आपण रात्री उरलेल्या भाताचा ढोकळा कसा बनवायचा हे पाहणार आहोत.

साहित्य –

१ कप रात्री उरलेला भात

३/४ कप दही

३ चमचे रवा

बारीक कापून घेतलेलं आलं आणि हिरवी मिरची

सोडा

मीठ

हेही वाचा…१० मिनिटांत करा ‘कच्च्या केळ्यांचे तिखट काप’; ‘ही’ चटपटीत रेसिपी लगेच नोट करा…

कृती –

बाउलमध्ये एक कप भात, दही, रवा घ्या. त्यात बारीक कापून घेतलेलं आलं, हिरवी मिरची, मीठ घाला आणि मिश्रण एकजीव करून घ्या.

त्यानंतर तुम्ही हे सर्व मिक्सरमध्ये बारीक करून घ्या.

त्यांतर तयार मिश्रणात चिमूटभर सोडा घाला.

आता ढोकळा बनवण्यासाठी भांड्यात एक स्टँड ठेवा, नंतर त्यावर एक प्लेट ठेवा आणि दहा मिनिटे तसंच ठेवा.

अशाप्रकारे ‘उरलेल्या शिळ्या भाताचा करा मऊ ढोकळा’ तयार.