आईला एखाद्या दिवशी जेवणासाठी पोळी करायचा कंटाळा आला की, पाव किंवा ब्रेड बरोबर भाजी खाल्ली जाते. पण, जेवणानंतर उरलेला ब्रेड असाच फ्रिजमध्ये पडून राहतो. ब्रेड कडक झालं तर मग तो टाकून द्यावा लागतो. तर असं न करता तुम्ही ब्रेडपासून एक खास पदार्थ बनवू शकता. या पदार्थाचे नाव आहे ‘ब्रेड पोहा’. तर ‘ब्रेड पोहा’ कसा बनवायचा चला पाहू.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

साहित्य –

  • पोहे, चौकोनी कापलेले ब्रेडचे तुकडे, हळद, मसाला, मोहरी, धने जिरे पूड, हळद, चिरलेल्या मिरच्या, टोमॅटो, कांदा, कोथिंबीर, कडीपत्ता, साखर, मीठ.

हेही वाचा…Wheat Kheer Recipe: पौष्टिक अन् खमंग गव्हाची खीर बनवा; ‘ही’ सोपी पद्धत लगेच नोट करा

कृती –

  • एका कढईत दोन चमचे तेल घ्या.
  • तेल गरमं झालं की, त्यात मोहरी घालावी. नंतर कडीपत्ता, बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, टोमॅटो, घालून मध्यम आचेवर चांगलं परतवून घ्या.
  • नंतर त्यात चवीसाठी चिमूटभर साखर, हळद, मीठ, तिखट, धने जिरे पूड आणि मग त्यात चौकोनी तुकडे करून घेतलेले ब्रेडचे तुकडे घाला व त्याला पाच मिनिटे शिजू द्या.
  • आपल्या नेहमीच्या पोह्यासारखं रूप आलं की, गॅस बंद करा. शेवटी सजावटीसाठी वरून कोथिंबीर घालून घ्या.
  • अशाप्रकारे तुमचा ‘ब्रेड पोहा’ तयार.
मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Make delicious home made bread poha for breakfast or evening snacks note the yummy recipe asp