आपल्या आहारात पोळी, भाजी, भात, डाळ यांचा समावेश हमखास असतो. अनेकदा बाहेरून काहीतरी खाऊन आलो म्हणून तर भूक नाही या कारणाने आपल्यातील अनेक जण कमी जेवतात. त्यामुळे दुसऱ्या दिवशी उरलेल्या पोळ्यांच काय करावं हा प्रश्न आईला अनेकदा पडतो. तर आता तुम्हाला टेन्शन घेण्याची गरज नाही. कारण तुम्ही रात्रीच्या उरलेल्या पोळीचा चिवडा बनवू शकतो. कुरकुरीत पोळीचा चिवडा कसा बनवायचा चला पाहुयात.

कृती –

  • रात्रीच्याउरलेल्या पोळ्या, शेंगदाणे, कडीपत्ता, जिरं, हळद, कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर, मीठ.

हेही वाचा…नॉनव्हेज प्रेमींना नक्की आवडेल झणझणीत पारंपरिक ‘चिकन खर्डा’; लगेच नोट करा रेसिपी…

साहित्य –

  • सगळ्यात पहिला पोळीचे तुकडे करून घ्या. त्यानंतर या तुकड्यांचा चुरा करून घ्या. पोळीचा चुरा एका प्लेटमध्ये काढून ठेवा.
  • त्यानंतर पॅनमध्ये दोन चमचे तेल गरम करून घ्या. तेल गरम झाल्यानंतर त्यात एक चमचा जिरं, कडीपत्ता, व बारीक चिरलेली हिरवी मिरची घालून भाजून घ्या.
  • नंतर त्यात एक कप शेंगदाणे, बारीक चिरलेला कांदा घाला आणि भाजून घ्या.
  • त्यानंतर चवीनुसार मीठ, हळद आणि पोळीचा चुरा घालून मिश्रण एकजीव करून घ्या आणि दोन मिनिटे असंच ठेवा.
  • एक वाफ आल्यानंतर गॅस बंद करा आणि शेवटी कोथिंबीर घालून सर्व्ह करा.
  • अशाप्रकारे तुमचा कुरकुरीत ‘पोळीचा चिवडा’ तयार.