महासत्तेच्या प्रमुखाची पत्नी एवढीच त्यांची ओळख.. पण स्वत:च्या जगण्यातून आलेल्या कळकळीमुळे मिशेल ओबामा निराळ्या ठरल्या.. 

‘‘विविधता तुमच्या प्रगतीला असलेला धोका नाही तर ही विविधता हाच आपला मोठेपणा आहे’’, हे म्हणणे मिशेल यांनी कायम ठेवले आणि केवळ ‘आपल्या समाजासाठी’ लोकानुनयी काम न करता सर्वासाठी केले. याचा भावार्थ केवळ अमेरिकाच नव्हे तर सर्वच विकासाभिमुख राष्ट्रांसाठी महत्त्वाचा ठरतो..

Inadequate Public Relations, Misconduct to office bearers , lead to cut the ticket, Mumbai bjp members of parliament, gopal Shetty, Poonam Mahajan, manoj kotak, lok sabha 2024, north Mumbai lok sabha seat, Mumbai north central lok sabha seat, north east Mumbai lok sabha seat, marathi news, bjp Mumbai, Mumbai news,
जनता व कार्यकर्त्यांशी उद्धट वर्तन मुंबईतील भाजपच्या तिन्ही खासदारांना भोवले
narendra modi
बहुसंख्य हिंदू तर मांसाहारीच!
Prime Minister Modi asserted that the gaming industry does not need regulation
‘गेमिंग उद्याोगा’ला नियमनाची गरज नाही! पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन; आघाडीच्या गेमर्सशी संवाद
Raj Thackeray, mahayuti support
राज ठाकरे यांच्या भूमिकेत कायमच सातत्याचा अभाव

त्या फॅशन शोंमध्ये सहभागी होण्याच्या फंदात पडल्या नाहीत तरी त्यांचा पेहराव आणि वस्त्रप्रावरणांची निवड अनुकरणीय होत गेली. मनोरंजन क्षेत्रातील अनेक मान्यवर त्यांच्या सहभागाची इच्छा व्यक्त करायचे तरी लोकप्रियता मिळवण्यासाठी कोणातरी तारेतारकांसमवेत नृत्य आदी उद्योग करावेत असे त्यांना वाटले नाही. त्यांच्याकडे वक्तृत्वकला नव्हती. नाही. तरीही केवळ अंत:प्रेरणेतून येणारे त्यांचे प्रांजळ मतप्रदर्शन ऐकण्यासाठी सगळेच उत्सुक असतात. राजकारण हे त्यांचे आवडीचे क्षेत्र कधीच नव्हते. तरीही डेमोक्रॅटिक पक्षाच्या पुढील अध्यक्षीय उमेदवार त्याच असाव्यात असा आग्रह आतापासूनच सुरू झाला आहे. एरवी एखाद्या देशप्रमुखाची पत्नी हे तसे शोभेचेच पद. पुष्पगुच्छासारखे दिसत आल्यागेल्याचे स्वागत करणे आणि प्रसंगोपात्त तृतीयपर्णी जिवांना खाद्य पुरवत राहणे इतकीच काय ती जबाबदारी. हे सगळे टाळत मिशेल ओबामा यांनी आपल्या नैसर्गिक साध्या वर्तणुकीतून या पदाचे भरजरी ऐश्वर्य गेली आठ वर्षे सहजपणे वागवले आणि दिवसभराच्या समारंभानंतर अंगावरचे दागिने उतरवून ठेवावेत इतक्या सहजपणे त्या व्हाइट हाऊस या जगातील सर्वात समर्थ निवासस्थानाचा निरोप घेण्यास सिद्ध झाल्या आहेत. या निवासस्थानातील कर्मचारी, आपले सहकारी आदींसमोर मिशेल ओबामा यांनी आपले शेवटचे अधिकृत भाषण केले. त्यातील मुद्दय़ांमागील प्रामाणिक आर्तता आणि पुढे काय वाढून ठेवले आहे याचा अभिनिवेश नसलेला आढावा यामुळे हे भाषण आणि मिशेल ओबामा यांची अध्यक्षपत्नी म्हणून कारकीर्द दखलपात्र ठरते.

बराक ओबामा हे अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय अध्यक्ष. त्यामुळे अर्थातच मिशेल यादेखील पहिल्या कृष्णवर्णीय अध्यक्षपत्नी. मिशेल यांचे पणजोबा- वडिलांच्या वडिलांचे तीर्थरूप- हे गुलाम म्हणून अमेरिकेत आले आणि वडील फ्रेझर रॉबिन्सन हे शिकागोच्या दक्षिणेकडील इलिनॉईस येथे नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागात कामगार होते. महाविद्यालयाचा उंबरठा ओलांडणारी मिशेल ही त्यांच्या कुटुंबातील पहिली व्यक्ती. पण मिशेल यांनी हा उंबरठा ओलांडला तोच मुळी प्रज्ञावंताचे माहेरघर असलेल्या प्रिन्स्टन विश्वविद्यालयातून. पाश्र्वभूमी अशी गंडकारी असणाऱ्या अनेकांच्या पोटात एक आग असते. स्वत:ला सिद्ध करण्याची. मिशेल ओबामा हे या आगीचे धगधगते प्रतीक. ती विझवण्याचा प्रयत्न त्यांच्या आयुष्यात सुरुवातीला अनेकदा झाला. कृष्णवर्णीय आणि त्यातही तरुणी अशा मिशेल यांच्यातील शिक्षणाची आस हेसुद्धा यामागील कारण होते. तेव्हा आपल्याला अभ्यासात उत्तम यश मिळवायलाच हवे, दुसरा पर्यायच आपल्यासमोर नाही, याचे भान त्यांना सतत राहिले आणि त्यातून अतिहुशार विद्यार्थ्यांसाठीच्या विशेष वर्गात त्यांना नेहमीच प्रवेश मिळत राहिला. पुढे कायद्याची पदवी घेतल्यानंतरच्या उमेदवारीच्या काळात त्यांची बराक यांच्याशी ओळख झाली आणि ओबामा अध्यक्षपदी निवडले गेल्यावर त्या विद्यमान भूमिकेत शिरल्या. त्यांची जगाला ओळख झाली ती २००८ साली त्यांनी व्हॅनिटी फेअर या उच्चभ्रूंच्या झुळझुळीत मासिकाला दिलेल्या मुलाखतीद्वारे. वास्तविक जगातल्या एकमेव महासत्ताप्रमुखाची अर्धागी असणे ही एकच बाब डोक्यात हवा जाण्यासाठी पुरेशी होती. परंतु त्या हवेचा स्पर्शदेखील आपल्याला होणार नाही, याची काळजी मिशेल यांनी सातत्याने घेतली. व्हॅनिटी फेअर या मासिकातील मुलाखत ही त्या संभाव्य साध्या तरीही आकर्षून घेईल अशा श्रीमंतीची पहिली खूण. आता तुम्ही व्हाइट हाऊसच्या रहिवासी होणार, तेव्हा मनात काय भावना आहेत, या अतिपरिचित बालिश प्रश्नाच्या उत्तरात त्या इतकेच म्हणाल्या : काही विशेष नाही. पण माझ्या मुलींच्या शाळाप्रवेशाची तेवढी काळजी आहे मनात.

ही शालेय शिक्षणाची काळजी हा त्यांचा अध्यक्षीय पत्नी म्हणून कायमस्वरूपी ध्यास राहिला. त्यामुळे त्यांचे निरोपाचे भाषण झाले तेदेखील या शालेय शिक्षण प्रतिनिधीसभेसमोर हा काही योगायोग नाही. अध्यक्षपत्नी या नात्याने मिशेल यांनी तीन गोष्टींवरच भर दिला. प्रत्येक विद्यार्थ्यांने शालेय शिक्षणात अधिकाधिक प्रगती करावी, वयाच्या कोणत्याही टप्प्यावर शारीरिक स्थूलतेचा स्पर्श होऊ देऊ नये आणि लष्करी कर्मचाऱ्यांसाठी उत्तमोत्तम सुविधा पुरवल्या जाव्यात तसेच जास्तीत जास्त जणांनी लष्करी सेवेत जावे. मिशेल यांनी  अध्यक्षपत्नी म्हणून हाती घेतलेली प्रत्येक मोहीम या तीनपैकी एका तरी घटकाविषयी होती. त्यातही शालेय शिक्षण हा त्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय. अमेरिकेतील शालेय शिक्षणाचा दर्जा वाढावा तसेच विद्वानांनाही शिक्षकी पेशा निवडावा असे वाटावे असा त्यांचा सतत प्रयत्न राहिला. ही बाब सर्वार्थाने लक्षणीय ठरते. अमेरिका आपल्या महाप्रचंड अर्थसंकल्पाचा १३.५ टक्के इतका वाटा केवळ शिक्षणावर खर्च करते. (आपण फक्त ३.५ टक्के इतकी रक्कम शिक्षणावर खर्च करतो. हे प्रमाण ६ टक्क्यांवर नेले जाईल असे आश्वासन भाजपने दिले होते. तूर्त तरी ते कागदोपत्रीच आहे.) परंतु अमेरिकी, आणि त्यातही अफ्रिकी अमेरिकी, तरुणांत शिक्षणाचे प्रमाण कमी आहे. ते अलीकडे वाढताना दिसत असेल तर त्यामागे मिशेल ओबामा यांचे प्रयत्न आहेत. वास्तविक पहिली कृष्णवर्णीय अध्यक्षपत्नी या नात्याने ‘आपल्या’ समाजासाठी लोकानुनयी असे बरेच काही करता आले असते. परंतु हा मार्ग टाळून त्यांनी दीर्घकालीन टिकाऊ असा शिक्षणप्रसाराचा ध्यास घेतला ही बाब विशेषत्वाने उल्लेखनीय ठरावी. २००७ साली आणि पुढे २०११-१२ साली बराक अध्यक्षीय निवडणुकीत उमेदवार असताना मिशेल प्रचारात चांगल्याच सक्रिय होत्या. परंतु या उभयतांकडून कोठेही कृष्णवर्णीयांच्या भावनांना हात घालण्याचा एकही प्रकार घडला नाही ही बाबदेखील महत्त्वाची ठरते. तीमागे जसे अमेरिकेचे मोठेपण आहे तसेच मिशेल आणि बराक या दोघांची सुसंस्कृतता आणि व्यवस्थेचे मोठेपण मान्य करण्याची वृत्तीदेखील आहे, हे मान्य करावयास हवे.

त्याचमुळे गतवर्षीच्या अध्यक्षीय निवडणूक मोहिमेत त्यांनी हिलरी क्लिंटन यांच्यासाठी केलेला प्रचार निर्णायक नाही तरी प्रभावी ठरला. अमेरिकेचे बहुसांस्कृतिकत्व राखण्याची कळकळ त्यातून दिसून आली. मिशेल यांच्या शेवटच्या भाषणात तर ती पुरून उरते. ते भाषण संख्येने कमी जणांपुढे झालेले असले तरी त्याचा भावार्थ केवळ अमेरिकाच नव्हे तर सर्वच विकासाभिमुख राष्ट्रांसाठी महत्त्वाचा ठरतो. ‘‘कुटुंबासाठी काबाडकष्ट उपसणारा प्रत्येक बाप एकाच आशेवर हे कष्ट उपसत असतो. आपली मुले शिकून आपल्या कष्टाचे चीज करतील. माझ्या मजूर वडिलांनी हेच स्वप्न पाहिले होते आणि तुमचेही वडील याच आशेने तुमच्याकडे पाहत आहेत. ते भले राजकारणी, उद्योजक, सरकारी अधिकारी, व्यापारी वा अन्य कोणीही असोत. तुम्ही अधिकाधिक शिकायला हवे हीच त्यांची इच्छा असणार. उत्तम शिकायचे आणि शिकलेले प्रत्यक्षात आणायचे यातूनच हा देश इतरांपेक्षा पुढे गेला आहे आणि ती आघाडी टिकवणे ही तुमची जबाबदारी आहे,’’ हे त्यांचे सांगणे महत्त्वाचे खरेच. पण त्याचबरोबर ‘‘जात, धर्म, वंश, वर्ण अशा प्रत्येकातील आपली देदीप्यमान विविधता राखणे हे तुमचे कर्तव्य आहे. ही विविधता तुमच्या प्रगतीला असलेला धोका नाही तर ही विविधता हाच आपला मोठेपणा आहे’’, हे त्यांचे म्हणणे बदलत्या वास्तवात अधिक महत्त्वाचे आहे. अमेरिकेतील सत्ताबदलासंदर्भात त्यांनी कोणतेही भाष्य केले नाही. पण त्यांचा या संदर्भातील अनुल्लेख हा अधिक उल्लेखनीय होता.

अखेर, ‘‘अध्यक्षीय पत्नी म्हणून माझ्या वर्तनाचा तुम्हालाही अभिमानच वाटला असेल’’, असे म्हणून त्या थांबल्या तेव्हा त्यांच्यापेक्षा इतरांच्याच डोळ्यांच्या कडा पाणावल्या. अध्यक्ष पतीच्या प्रत्यक्षापेक्षा त्याची प्रतिमाच अधिक उत्कट असल्याचे हे उदाहरण विलोभनीय तसेच अनुकरणीयदेखील ठरते.