‘सगळे आत्ताच’!

‘मी करोनामुळे नाही तर हे खाऊनच थकलोय’ असे सांगण्याचा प्रयत्न बंडय़ाने के ला,

‘वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता फु काचे’ तात्यांच्या भसाडय़ा आवाजात हा श्लोक ऐकू न बंडय़ाने क्षणभर दार किलकिले के ले व लगेच मिटून घेतले. पलीकडे काय वाढून ठेवले आहे याची कल्पना करताच त्याला त्याही स्थितीत दरदरून घाम फुटला. रात्री उशीरा करोनाची चाचणी पॉझिटीव्ह आल्यापासून बंडय़ा घाबरला होता. ज्या काढय़ाला, रसाला, जडीबुटीच्या औषधाला, चाटणाला गेली सव्वा वर्षे आपण विरोध के ला तेच आता तात्या आपल्याला देणार या भीतीने त्याची गाळण उडाली. ‘आलिया भोगासी’ असे म्हणत त्याने दार उघडले तर तात्यांसोबत मातोश्री भिजवलेले बदाम व किसमिसची प्लेट घेऊन उभ्या. बंडय़ाला आश्चर्याचा पहिला धक्का बसला. त्याने दोन चार बदाम कसेबसे पोटात ढकलले व मानेने नाही म्हणताच तात्या गरजले. ‘आमच्या सरकारने मंजूर के लेला आहार आहे. खावाच लागेल. वास नाही, चव नाही तरीही त्याने कसेबसे बकाणे भरले व ते दोघे परत जाताच समाधानाचा सुस्कारा सोडला. अध्र्याएक तासात काकू  पुन्हा हजर. रागी, दोसा व दलिया घेऊन. मला भूक नाही असे बंडय़ाने म्हणताच दारात उभ्या असलेल्या तात्यांनी आहाराचा सरकारी तक्ता फडकावला. त्यात या दोनपैकी एक असे म्हटलेय असे बंडय़ाने क्षीण आवाजात सांगून पाहिले, पण तात्यांच्या करडय़ा नजरेसमोर त्याचे काही चालेना. सर्व खाऊन झाल्यावर प्रचंड अंगदुखीतही पोट डचमळतेय असे बंडय़ाला जाणवले, पण तो पडून राहिला. तक्रोर के ली तर आणखी नवे काही खाऊ घालतील ही भीती होतीच. दुपारी दोघेही भरगच्च ताट घेऊन खोलीत येताच चिकनच्या वासाने बंडय़ा चमकला. अनेकदा इच्छा होऊनही घरात मांसाहारी भोजन कसे नाकारले जायचे याची आठवण त्याला झाली. एरवी कर्मठ असलेल्या तात्यांच्या मनोवृत्तीत सरकारी फतव्याने बदल व्हावा याचे त्याला आश्चर्य वाटत राहिले. चिकनवर तो ताव मारु लागताच तात्यांनी ताटाच्या बाजूला ठेवलेल्या गूळ व तुपाकडे त्याचे लक्ष वेधले. ‘तिखटासोबत गोड?’ असे शब्द अभावितपणे त्याच्या तोंडून बाहेर पडताच तात्यांनी कागद समोर धरला. सामिष भोजनाची पार वाट लावणाऱ्या त्या गुळ व तुपाला आत ढकलताना बंडय़ाला तीव्र वेदना झाल्या. टम्म फु गलेले पोट घेऊन तो आडवा झाला, पण झोप येईना. दुपारी चारच्या सुमारास पुन्हा दोघे पाच रंगाची फळे घेऊन हजर. ‘मी करोनामुळे नाही तर हे खाऊनच थकलोय’ असे सांगण्याचा प्रयत्न बंडय़ाने के ला, पण तात्यांसमोर त्याची काय बिशाद? ‘प्रत्येक रंगाच्या फळात वेगळे सत्त्व’ असे म्हणत तात्यांनी त्याला सर्वच फळे जबरदस्तीने खायला लावली. रात्री दोघे खिचडीचे ताट घेऊन आले तेव्हा बंडय़ाच्या जिवात जीव आला. कशीबशी ती संपवल्यावर आता सुटलो असे तो म्हणत असतानाच काकू  ‘डार्क चॉकलेट’ व हळदीचे दूध घेऊन आल्या. दोन्ही एकाचवेळी? असा मनात आलेला प्रश्न त्याने गिळून टाकला. चॉकलेटचे दूध प्यायल्यावर, हळदीचे दूध रात्री घेतो असे त्याने म्हणताच ‘आत्ताच’ असे तात्या गरजले. शेवटी सारे संपवून त्याने दार लावले व न्हाणीघरात जाऊन भडाभडा घशातील अन्न बाहेर काढले तेव्हा कु ठे त्याला हायसे वाटले. आता त्याला सरकारपेक्षा भक्तांचीच चिंता वाटू लागली होती. सरकारने केली सूचना खाद्यपदार्थाची, पण म्हणून एवढा अतिरेक? तोही आपल्याच पोटावर? या चिंतेत आपण बाधित आहोत, हेही तो विसरून गेला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व उलटा चष्मा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Loksatta ulta chasma diet for covid 19 patients zws