करोना व्हायरस या महारोगाने सगळ्या जगाला गुडघे टेकायला लावले. हात धुण्याची आणि सॅनेटायझर वापरण्याची सवय ही नित्याची होऊन गेली. अशात घर स्वच्छ ठेवण्यासाठी हे विषाणू मारण्यासाठी विविध परिणामकारक साधनांचा वापर केला जातो आहे. आपलं शेजार आणि घर हे दोन्ही परिसर त्याद्वारे स्वच्छ ठेवले जात आहेत. अशात घरातल्या विविध जागा स्वच्छ करणं आणि विषाणूमुक्त करणं ही आपली प्राथमिकता आहे. तसं झाल्यास लॉकडाउन उठण्यास मदत होऊ शकेल.

विविध पृ्ष्ठभागांवर व्हायरस असतो असं म्हटलं जातं. आपल्या घरातली जमीन, टेबल टॉप्स, वॉश बेसीन, लिफ्ट हँडल्स या जागांवर सारखे हात लागतात. या जागा स्वच्छ ठेवणं महत्त्वाचं आहे. या जागा स्वच्छ ठेवल्या जाण्यासाठी सगळेच प्रयत्न करत आहेत.

अशात एक महत्त्वाचं स्वच्छता साधन आहे ते म्हणजे डोमेक्स. डोमेक्स हे करोनाचे विषाणू नष्ट करतं असा दावा त्यांनी केला आहे. अवघ्या ६० सेकंदात करोनाचे विषाणू हे डोमेक्समुळे नष्ट होतात हे सिद्ध झाल्याचं डोमेक्सने म्हटलं आहे. डोमेक्समध्ये ब्लीच आणि सोडियम हायप्रोक्लोराइटचं योग्य मिश्रण आहे. त्यामुळे डोमेक्स अवघ्या साठ सेकंदात करोना विषाणूचा खात्मा करतं.

 

करोना व्हायरस आणि सार्स कोव्ह 2 या विषाणूंचा खात्मा डोमेक्स करतं हे अमेरिकेतल्या लॅबमध्ये सिद्ध झाल्याचं डोमेक्सनं म्हटलं आहे. अमेरिकेतल्या विषाणू तज्ज्ञांनीही डोमेक्सला हे उत्तम क्लिनर
असल्याचं म्हटलं आहे. डोमेक्स हे असं फ्लोअर क्लिनर आहे ज्यामुळे करोना विषाणूंचा खात्मा होतो असं त्यांनी म्हटलं आहे.

बॅक्टेरिया, व्हायरस, फंगी हे शब्द रोज आपल्या कानावर पडत आहेत. आपण त्यांचा सामना ही करतो आहोत. या सगळ्यांच्या दहशतीत आपल्याला आपली सुरक्षा कायम ठेवायची आहे. त्यामुळे डोमेक्स वापरा आणि विषाणूमुक्त व्हा. कारण डोमेक्स हे असं क्लिनर आहे जे करोनाचे विषाणू संपवतं. एका पुसण्याने डोमेक्स घराची लादी, ओटा, इतर पृष्ठभाग स्वच्छ करतं. स्वच्छता हा सध्याच्या काळात अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. अशात डोमेक्स स्वच्छतेची प्रत्येक गरज पूर्ण करणारं क्लिनर ठरलं आहे. डोमेक्स वापरा आणि घराची फरशी, स्वच्छतागृहे, बाथरुम स्वच्छ ठेवा.