सणासुदीचा हंगाम जवळ आला आहे. असा हंगाम आपण ठरवलेल्या मोठ्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी अगदी योग्य मुहूर्त मानला जातो. हीच बाब लक्षात घेऊन या कालावधीत अनेक उत्तमोत्तम ऑफर्स येत असतात. त्यामुळे अशा ऑफर्स आणि लॉन्चचा लाभ घेण्याचीही हीच खरी वेळ आहे.

जेव्हा कार खरेदीचा विचार मनात येतो, तेव्हा सर्वाधिक महत्त्व हे सुरक्षेला दिलं जातं. त्यानंतर इंधन बचतीची क्षमता, कारचा परफॉर्मन्स, कारची वैशिष्ट्ये, कारचा लुक या गोष्टी पाहिल्या जातात. महत्त्वाची बाब म्हणजे, टाटा मोटर्सच्या कार्स या सर्वच बाबतीत उजव्या ठरतात! मग ती टाटाची टियागो असो, टिगोर सीएनजी असो, अल्टोज असो वा नेक्सन आणि पंच असो. पण या गाड्या नेमक्या कुणाच्याही स्वप्नवत कार्स का असतात? चला पाहुयात…

fssai to examine mdh and everest spices banned recently in singapore and hong kong
मसाल्यावरील बंदीच्या  सिंगापूर, हाँगकाँगच्या निर्णयाची तपासणी; एफएसएसएआय, मसाला मंडळाचे पाऊल
Pune Fraud Racket, Busted, Five Arrested, Cheating Citizens, Sending Money, Hong Kong, Cryptocurrency, cyber police, fraud in pune,
पिंपरी : क्रिप्टोकरन्सीद्वारे फसवणुकीचे रॅकेट हाँगकाँगमधून; पैसे मोजण्याच्या मशीनसह सात लाख रुपये जप्त
DRDO ACEM Nashik Recuritment 2024
DRDO ACEM नाशिकद्वारे अप्रेंटिसच्या पदासाठी होणार भरती! ३० एप्रिलपर्यंत करू शकता अर्ज, जाणून घ्या पात्रता निकष
Post Office FD Rate and Calculations in Marathi
पोस्टाच्या पाच वर्षांच्या FD मध्ये किती परतावा मिळतो? पोस्ट ऑफिसची मुदत ठेव योजना व नफ्याची आकडेवारी पाहा

टाटा मोटर्सचं सुरक्षिततेला प्राधान्य

सुरक्षिततेसंदर्भातल्या मानकांच्या बाबतीत टाटा मोटर्सनं नेहमीच अग्रेसर कामगिरी केली आहे. भारतातील सर्वात सुरक्षित कार्ससंदर्भात Global NCAP ने नुकत्याच जाहीर केलेल्या यादीमध्ये टाटा मोटर्स सर्वोच्च स्थानी आहे. आपण कार चालवत असताना आपली स्वत:ची आणि आपल्या कुटुंबाची सुरक्षा आपल्यासाठी सर्वात महत्त्वाची असते. इथेच Global NCAP रेटिंग महत्त्वाचे ठरते. कार्सची सुरक्षिततेबाबतच्या अनेक निकषांवर चाचणी केल्यानंतरच हे रेटिंग दिलं जातं.

टाटा पंच या सब-कॉम्पॅक्ट एसयूव्हीने हॅचबॅक टाटा अल्ट्रोझसह क्रॅश टेस्टिंगमध्ये पाच स्टार मिळवले आहेत. टाटा नेक्सॉन या SUV ला देखील सुरक्षेच्या निकषांवर पाच स्टार मिळाले आहेत. दरम्यान. Global NCAP ने चाचणी केलेली पहिली इलेक्ट्रिक कार ठरलेल्या टाटा टिगोरनं चार स्टार मिळवले आहेत. तिच्या एअरबॅग्ज आणि सुरक्षेबाबतची इतर वैशिष्ट्ये यासाठी महत्त्वाची ठरली. दोन फ्रंटल एअरबॅग्ज असलेल्या टाटा टिगोर आणि टियागो या दोन्ही कार्सना सुरक्षिततेसाठी चार स्टार मिळाले आहेत.

स्मार्ट अपग्रेड

सुरक्षेसोबतच इतरही वैशिष्ट्ये असणाऱ्या टाटा मोटर्सच्या कार ग्राहकांना त्यांची जीवनशैली सुधारण्याची संधी देतात. विशेषत: हॅरियर, नेक्सॉन, अल्ट्रोझ आणि टियागो सारख्या मॉडेल्सद्वारे. यामध्ये फ्रंट पार्किंग सेन्सर्स, अॅप-आधारित TPMS (टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम) आणि वायरलेस मोबाइल होल्डर्स, स्वयंचलित सनरूफ, मूड लाइटिंग इत्यादींचा समावेश आहे.

प्रत्येक टाटा मोटर्स कार तिच्या अनोख्या वैशिष्ट्यांमुळे इतर कार्सपेक्षा वेगळी ठरते. त्यांच्या अनोख्या डिझाइन्स आणि मायलेज विचारात घेऊन येथे काही अव्वल दर्जाच्या टाटा कार्सचे प्रकार देण्यात आले आहेत.

टाटा टियागो

टाटा टियागो ही कार हॅचबॅकच्या सुविधेसह किफायतशीर किमतीत ग्राहकांना उत्तम दर्जाचा अनुभव देणारी ठरली आहे. ज्यामध्ये प्रवाशांसाठी मागील सीटवर पुरेशी जागा आहे. टियागो पेट्रोल आणि पेट्रोल-CNG अशा दोन्ही प्रकारांमध्ये येते. दोन्ही १.२-लिटर इंजिन पॉवर्ड आहेत. CNG प्रकारातील कार मॅन्युअल गिअरबॉक्ससह येते.

टाटा टिगोर

टाटा टिगोर टाटा मोटर्सच्या सर्वात लोकप्रिय मॉडेलपैकी एक आहे. टिगोरचे सीएनजी मॉडेल अंदाजे २६.४ किमी/किलो इतके मायलेज देते. हे मॅन्युअल ट्रान्समिशनमध्येही उपलब्ध आहे. टाटा टिगोर XZ CNG चार रंगांमध्ये आहे. ऍरिझोना ब्लू, डेटोना ग्रे, मॅग्नेटिक रेड आणि ओपल व्हाइट या चार रंगांचा त्यात समावेश आहे.

टाटा अल्ट्रोझ

ही एक चांगल्या लुकची कार आहे. ही टाटाची प्रीमियम हॅचबॅक कार असून तिचे १.२-लिटर क्षमतेचे नॅच्युरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन आहे. त्याच युनिटचं टर्बोचार्ज मॉडेल १.५-लीटर डिझेल मिलसहदेखील उपलब्ध आहे. ज्यामुळे तुम्हाला उत्कृष्ट ड्रायव्हिंगचा अनुभव मिळेल.

टाटा पंच

‘टफ युटिलिटी वुईथ स्पोर्टिंग डायनॅमिक्स’ म्हणून ओळख असलेली टाटा पंच ही तिच्या नावाप्रमाणेच दमदार परफॉर्मन्स देते. सहा प्रकारांमध्ये उपलब्ध असणारी टाटा पंच १८.८ ते १८.९ किलोमीटर प्रतिलिटर मायलेज देते.

टाटा नेक्सॉन

१७ ते २१ किलोमीटर प्रतिलिटर मायलेज देणारी कॉम्पॅक्ट एसयूव्ही टाटा नेक्सॉन एकाहून अधिक इंजिन-गिअरबॉक्सच्या पर्यायांमध्ये उपबल्ध आहे. टाटा नेक्सॉन ही अशी पहिली भारतीय कार आहे जिला Global NCAP द्वारे सुरक्षेच्या बाबतीत पाच स्टार देण्यात आले आहेत.

टाटा हॅरियर

ही SUV सेगमेंटमधील अग्रगण्य कार मानली जाते. किफायतशीर, उत्कृष्ट वैशिष्ट्ये आणि जबरदस्त मायलेज असणारी ही टाटा हॅरियर कार आहे. सहा एअरबॅग्ज असल्यामुळे ही कार सुरक्षिततेसाठी उत्तम पर्याय मानली जाते. यात पॅनोरॅमिक सनरूफ, वायरलेस चार्जर, ड्रायव्हर आणि को-ड्रायव्हरसाठी हवेशीर सीट, तसेच ऑटो होल्डसोबत इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक (EPB) देखील आहे.

टाटा सफारी

हॅरियर आणि सफारी मध्ये १७०एचपी, सिक्स स्पीड मॅन्युअल किंवा सिक्स स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह २ लिटर डिझेल इंजिन आहे. जेट एडिशनमुळे सफारी आणि हॅरियर कार्समध्ये सुरक्षेबाबतच्या अतिरिक्त बाबी देखील समाविष्ट होतात. यात ड्रायव्हरला डुलकी लागत असल्यास अॅलर्ट सिस्टीम, पॅनिक ब्रेक अलर्ट आणि आफ्टर इम्पॅक्ट ब्रेकिंग, तसेच सफारीसाठी नवीन हेड रिस्ट्रेंट्स यांचा समावेश आहे.

अशाप्रकारे, सुरक्षेबाबतचे रेटिंग्ज असो, मायलेज असो किंवा दमदार लुक असो, या सणासुदीच्या हंगामात योग्य कार निवडायची असल्यास टाटा मोटर्स हाच योग्य पर्याय आहे.