आपल्याकडेही एखादा आयफोन असावा अशी अनेकांची इच्छा, स्वप्न असते. मात्र, आता तुम्हाला ते स्वप्न पूर्ण करता येऊ शकते. कारण ॲमेझॉन या शॉपिंग साईटवर वर्षातील सर्वात पहिला आणि सर्वात मोठा ग्रेट रिपब्लिक डे सेल हा १३ जानेवारीपासून म्हणजे आजपासून सुरू होणार आहे, जो १८ जानेवारीपर्यंत सुरू राहील. त्यामुळे या सेलदरम्यान अनेक वस्तूंवर ग्राहकांना भरभरून सवलत मिळणार आहे. त्यामध्ये आयफोन १३ [iPhone 13] सुद्धा समाविष्ट आहे. तुम्ही जर हा फोन विकत घेण्याचा विचार करत असाल तर काही मुद्दे विचारात घेणे तुमच्यासाठी गरजेचे असू शकते. ते कोणते ते पाहा.

खरंतर ॲपलचा कोणताही फोन घेतला तरीही लोकांचे लक्ष तुमच्याकडे जातेच. मात्र, आयफोन १३ या फोनमध्ये इतर नवीन व्हेरियंटसुद्धा उपलब्ध आहेत. त्यामुळे केवळ किंमत कमी झाली आहे म्हणून हा फोन घेणे तुमच्यासाठी कितपत फायद्याचे असू शकते हे तुम्ही पुढील मुद्दे वाचून स्वतःसाठी ठरवू शकता.

Request for application from Reserve Bank to Small Finance Bank for conversion to regular banks
नियमित बँकांमध्ये रूपांतरणासाठी रिझर्व्ह बँकेकडून लघुवित्त बँकाकडे अर्जाची मागणी
Mixed trend in global markets and selling by investors in banking finance and consumer goods stocks
पाच सत्रातील तेजीला खिंडार; नफावसुलीने ‘सेन्सेक्स’ला सहा शतकी झळ
nestle India shares slip after reports says baby food contain high levels of added sugar
नेस्लेला ८,१३७ कोटी बाजार भांडवलाची झळ; दुग्धजन्य पदार्थांबाबतच्या वृत्ताने भांडवली बाजारात समभागात घसरण
India Wholesale Inflation Reaches 3 Month High
घाऊक महागाई दर मार्चमध्ये किंचित वाढून तिमाही उच्चांकावर

हेही वाचा : फ्लिपकार्टचा Republic Day Sale ‘या’ तारखेपासून होणार सुरू! ग्राहकांना आयफोनपासून ‘या’ उत्पादनांवर मिळणार भरघोस सूट

आयफोन १३ ची सध्याची किंमत ही ५२,९९९ रुपये इतकी आहे. मात्र, ॲमेझॉनच्या सेलदरम्यान हाच फोन ग्राहकांना ४९,९९९ रुपयांना विकत घेता येणार आहे. इतकेच नव्हे, जर तुम्ही एसबीआय बँकेच्या क्रेडिट कार्डचा ईएमआयच्या पर्यायासाठी वापर केलात, तर त्यावर तुम्हाला १००० रुपयांची अतिरिक्त सूट मिळवता येईल. याचा अर्थ तुम्ही आयफोन१३; ४८,९९९ रुपये इतक्या स्वस्त किमतीत घेऊ शकता. यापलीकडे जर तुमच्याकडे जुना आयफोन असले तर तो देऊनही तुम्हाला त्यावर भरघोस सूट मिळवता येऊ शकते.

मात्र, तुमचे लक्ष केवळ आयफोन १३ वर न ठेवता, ज्यांना त्यांचे जुने फोन अपग्रेड करायची इच्छा असेल, त्यांनी ॲपलच्या इतर फोनवर म्हणेजच iPhone 14, iPhone 14 Plus आणि iPhone 14 Pro वरदेखील ठेवा; कारण त्यावरसुद्धा तुम्हाला उत्तमोत्तम ऑफर्स मिळू शकतात.

आयफोन १३ घेणे तुमच्यासाठी फायद्याचे आहे का?

२०२४ या वर्षात नवनवीन आलेल्या किंवा येणाऱ्या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला आयफोन १३ घेणे हे तुमच्या गरजांवर अवलंबून आहे. अर्थातच, हा फोन तुम्हाला उत्तम परफॉर्मन्स देऊ शकतो. यामध्ये भरपूर स्टोरेज, उत्तम कॅमेरा आणि अधिक काळ चालणारी बॅटरी बसवण्यात आलेली आहे. मात्र, नवीन आलेल्या स्मार्टफोनप्रमाणे या फोनचा रिफ्रेश रेट तुलनेने कमी आहे. कॅमेरामध्ये इतर नव्या स्मार्टफोनसारखी भारीतली झूम लेन्स किंवा टेलेफोटो लेन्ससारखे फीचर्स नाहीत.

हेही वाचा : नव्याकोऱ्या POCO X6 सिरीजची किंमत पाहून होईल आनंद! काय आहेत फीचर्स, स्पेसिफिकेशन जाणून घ्या…

मात्र, जर फोनची एकंदरीत पॉवर पाहता किंवा फोटोची क्वॉलिटी पाहिल्यास तुम्ही निराश होणार नाही. त्यामुळे सध्या सुरू होणाऱ्या सेलदरम्यान तुमच्यासाठी बजेटमध्ये बसणारा आयफोन घ्यायची ही सुवर्ण संधी असू शकते.

मात्र, जर तुम्हाला सर्वोत्तम डिझाईन, स्क्रीन, कॅमेरा आणि झूम करण्याची क्षमता इत्यादी अपडेटेड फीचर्स हवे असल्यास आयफोनच्या वरच्या मॉडेल्सचा विचार करू शकता किंवा कदाचित नवीन येऊ शकणाऱ्या आयफोन १५ ची वाट पाहू शकता. मात्र, इतर मॉडेल घेण्यासाठी तुम्हाला पैसे जमवण्याची तयारी करावी लागेल, अशी माहिती इंडिया टुडेच्या एका लेखावरून समजते.

सर्वात शेवटी, तुम्ही ग्राहकांनी कोणता फोन घेणे योग्य आहे, हे तुमच्या गरजा आणि अपेक्षांचा विचार करून ठरवणे गरजेचे आहे.