scorecardresearch

Apple चे सह-संस्थापक स्टीव्ह जॉब्सच्या मुलीने उडवली होती ‘या’ स्मार्टफोनची खिल्ली, आता करतेय त्याचाच वापर

ज्या स्मार्टफोनची Apple चे सह-संस्थापक स्टीव्ह जॉब्सच्या मुलीने उडवली खिल्ली आता पडली त्याच्याच प्रेमात…

Steve Jobs daughter recommends iPhone 14
स्टीव्ह जॉब्सची मुलगी वापरते 'हा' स्मार्टफोन (फोटो-प्रातिनिधिक)

Steve Jobs’ Daughter: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, सेलिब्रिटी, उद्योगपती, मोठे नेते यांचे लाईफस्टाईल कसे असते. ते कोणते रुटीन फॉलो करतात. तसेच, ते कोणता फोन वापरतात हे जाणून घेण्यासाठी जगभरातील तंत्रज्ञानप्रेमी नेहमीच उत्सुक असतात. आजकाल, बहुतेक सेलिब्रिटी, उद्योगपती इत्यादी सर्व मोठे लोक प्रीमियम मोबाईल फोन ब्रँड Apple किंवा Samsung स्मार्टफोन वापरतात. दरम्यान, एका मुलाखतीत अॅपलचे सहसंस्थापक स्टीव्ह जॉब्स यांची मुलगी इव्ह जॉब्स (Eve Jobs) ने ती कोणता स्मार्टफोन वापरते हे सांगितले आहे.

Apple चे संस्थापक स्टीव्ह जॉब्स यांची मुलगी इव्ह जॉब्स हिने iPhone 14 सीरीज लाँच झाल्यावर खिल्ली उडवली होती. इव्ह जॉब्सने इंस्टाग्रामवर एक मीमही शेअर केला. मीम्समध्ये असे दिसून येते की, एखादी व्यक्ती आधीपासून घातलेला शर्ट त्याच प्रकारचा नवीन शर्ट खरेदी करत आहे. “मी iPhone 13 वरून iPhone 14 वर अपग्रेड करत आहे, असे तिने मीम्समध्ये कॅप्शन दिले होते.

इव्ह जॉब्स वापरते ‘हा’ स्मार्टफोन

स्टीव्ह जॉब्सची मुलगी इव्ह जॉब्स सध्या Apple चा iPhone 14 वापरते. मात्र, गेल्या वर्षी जेव्हा हा स्मार्टफोन लॉन्च झाला तेव्हा इव्ह जॉब्सने या फोनबद्दल एक मीम शेअर केला होता, जो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यावेळी इव्ह जॉब्सला हा फोन आवडला नाही आणि तिने आयफोन 13 आणि आयफोन 14 या मॉडेलला एकसारखे असल्याचे म्हटले. द स्ट्रॅटेजिस्टला दिलेल्या मुलाखतीत इव्ह जॉब्सने सांगितले की, जसजसी ती आयफोन 14 वर जास्त वेळ घालवू लागली, तसतसा तिला हा फोन मजेदार वाटू लागला. इव्ह जॉब्स म्हणाल्या की, मोबाईल फोन हा आपल्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे आणि त्याशिवाय आपले जीवन अपूर्ण आहे. यासोबतच मोबाईलमुळे लोकांची जीवनशैली बदलली असल्याचेही त्यांनी सांगितले.

(हे ही वाचा : १.२९ लाखाचा लॅपटॉप मिळतोय अवघ्या १७ हजारात, जाणून घ्या ऑफर एका क्लिकवर )

Apple चे सह-संस्थापक स्टीव्ह जॉब्स यांना ४ मुले आहेत, त्यापैकी सर्वात लहान इव्ह जॉब्स आहे. इव्ह जॉब्सने अलीकडेच स्टॅनफोर्ड विद्यापीठातून पदवी प्राप्त केली आहे. अभ्यासासोबतच इव्ह जॉब्स मॉडेलिंगही करते. याशिवाय त्यांना घोडेस्वारी आणि अनेक क्रीडा उपक्रमांचाही शौक आहे.

आयफोन 14 चे स्पेसिफिकेशन्स

iPhone 14 मध्ये ६.६-इंचाचा डिस्प्ले आहे. मोबाईल फोन A15 बायोनिक चिपसेटवर काम करतो आणि त्याच्या मागील बाजूस १२ मेगापिक्सेलचे दोन कॅमेरे आणि समोर १२ मेगापिक्सेल कॅमेरा आहे. सध्या भारतात iPhone 14 ची किंमत ७९,९९९ रुपये आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-04-2023 at 17:00 IST

संबंधित बातम्या