जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, एक्स आणि स्पेसएक्स या कंपन्यांचे सर्वेसर्वा एलॉन मस्क यांनी अमेरिकन स्मार्टफोन निर्माती कंपनी अ‍ॅपल आणि ओपनएआयच्या भागीदारीचा कडाडून विरोध केला आहे. मस्क केवळ विरोध करून थांबले नाहीत तर त्यांनी अ‍ॅपलला थेट धमकी दिली आहे. “अ‍ॅपलने ही भागीदारी केली तर आम्ही आमच्या सर्व कंपन्यांमध्ये अ‍ॅपल कंपनीच्या आयफोनसह सर्व उत्पादनांवर बंदी घालू”, असं त्यांनी म्हटलं आहे. एलॉन मस्क म्हणाले की, “ही भागीदारी म्हणजे सुरक्षेचं अस्वीकार्य उल्लंघन आहे. अ‍ॅपल आणि ओपन एआयमधील करार जारी राहिला तर आम्ही आमच्या सर्व कंपन्यांमध्ये अ‍ॅपल डिव्हाईसेसवर बंदी घालू. आमच्याकडे त्यांच्यावर बंदी घालण्याशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही.”

मस्क यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर अनेक पोस्ट केल्या आहेत. या पोस्ट्सद्वारे त्यांनी युजर्सच्या खासगी माहितीच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे. तसेच ते म्हणाले, “ही भागीदारी होऊ नये असं मला प्रामाणिकपणे वाटतं.”

Aai Kuthe Kay Karte
अरुंधतीचं पूर्ण नाव काय? प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरच्या पत्नीने दिलं एकदम करेक्ट उत्तर, पाहा व्हिडीओ
Eknath Shinde
Eknath Shinde : तुम्ही गृहखातं, विधानसभा अध्यक्षपद मागितलं…
Bipin preet singh Success Story
Success Story : आठ लाखांच्या बचतीतून सुरू केला व्यवसाय अन् उभी केली करोडोंची कंपनी
Fast Charging Ruin Your Phone Battery
Fast Charging Hurt Your Phone Battery: फास्ट चार्जिंगमुळे होऊ शकते तुमच्या फोनचे नुकसान? ‘या’ पाच समस्यांबद्दल आजच जाणून घ्या
Shah Rukh Khan Rejected Karan Arjun
‘या’ कारणामुळे शाहरुख खानने ‘करण अर्जुन’ करायला दिला होता नकार, आमिर खानची लागली होती वर्णी, पण…
aishwarya rai and abhishek bachchan
“सेटवर आम्ही कधीच त्यांना…”, ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चनबाबत अभिनेता म्हणाला, “त्यांच्या नात्यामुळे…”
Reserve Bank,
“मी लष्कर-ए-तोयबाचा सीईओ बोलतोय, तुमच्या मागचा रस्त्यावर…”; रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन!

अ‍ॅपलने १० जून रोजी त्यांच्या वार्षिक डेव्हलपर्स इव्हेंटमध्ये त्यांच्या सर्व डिव्हाईसेसमध्ये चॅट जीपीटीचा चॅटबॉट सादर करण्यासाठी ओपन एआयबरोबरच्या कराराची घोषणा केली. अ‍ॅपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी टिम कूक यांनी घोषणा केली की, Apple IOS18 मध्ये OpenAI इंटिग्रेट केली जाईल. त्यानंतर युजर्स सीरी (Siri) या ओपनएआयच्या लोकप्रिय चॅटजीपीटी चॅटबॉटचा वापर करू शकतील. सीरी हा चॅटबॉट आता अधिक अद्ययावत झाला आहे.

एलॉन मस्क यांचे अ‍ॅपलवर गंभीर आरोप

अ‍ॅपलने म्हटलं आहे की चॅटजीपीटी चॅटबॉटच्या वापराआधी युजर्सची परवानगी मागितली जाईल. त्यानंतर युजर्स या बॉटचा वापर करू शकतील, प्रश्न विचारू शकतील. परंतु, युजर्सची माहिती, विनंत्या आणि प्रश्न साठवून ठेवली जाणार नाही. अ‍ॅपल आणि ओपनएआयमधील या करारावर एलॉन मस्क यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच कंपनीने त्यांच्या युजर्सची साठवून ठेवलेली माहिती ओपनएआयबरोबर शेअर केल्याचा आरोपही केला आहे.

हे ही वाचा >> Apple Intelligence लाईव्ह इव्हेंट; आयपॅड, आयफोन, AI कोणत्या गोष्टींबद्दल होणार चर्चा? जाणून घ्या

एलॉन मस्क यांची धमकी

iPhone, iPad आणि Mac साठी अ‍ॅपल कंपनीने अ‍ॅपल इंटेलिजन्स सादर करताना टिम कूक म्हणाले, हे (टूल) वैयक्तिक, शक्तीशाली आणि खासगी आहे. तसेच ते टूल युजर्स दररोज अवलंबून असलेल्या अ‍ॅप्सना एकीकृत करेल. कूक यांची एक्सवरील यासंबंधीची पोस्ट रिपोस्ट करत एलॉन मस्क म्हणाले, मला हे नको आहे, एकतर तुम्ही हे भयंकर स्पायवेअर बंद करा, नाहीतर आमच्या कंपन्यांमध्ये आम्ही अ‍ॅपलच्या डिव्हाईसेसवर बंदी घालू.