Premium

म्युझिक स्ट्रिमिंगची ‘ही’ कंपनी कर्मचाऱ्यांना बसवणार घरात ! वाचा किती लोकांच्या जाणार नोकऱ्या…

लोकप्रिय म्युझिक स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्मने अलीकडेच जाहीर केले की, त्यांच्या प्लॅटफॉर्मवरील कर्मचारी संख्या १७ टक्क्यांनी कमी करणार आहेत.

music streaming company Spotify Announce Layoffs Ceo says 17 per cent employees to go immediately
(फोटो सौजन्य: @indianexpress) म्युझिक स्ट्रिमिंगची 'ही' कंपनी कर्मचाऱ्यांना बसवणार घरात ! वाचा किती लोकांच्या जाणार नोकऱ्या…

स्मार्टफोनमध्ये सुरुवातीला म्युझिक (Music) हा एक ॲप इनबिल्ट असायचा, ज्यात प्रत्येक जण त्यांची आवडीची गाणी डाऊनलोड करून ऐकत होतो. तर आता यूट्यूब म्युझिक, स्पॉटिफाय (Spotify) आदी विविध ॲपवर आपण ऑनलाइन गाणी ऐकतो; तर आता लोकप्रिय म्युझिक स्ट्रिमिंग स्पॉटिफाय प्लॅटफॉर्मने अलीकडेच जाहीर केले की, त्यांच्या प्लॅटफॉर्मवरील कर्मचारी संख्या १७ टक्क्यांनी कमी करणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्पॉटिफाय प्लॅटफॉर्मचे सीईओ डॅनियल यांनी एका ब्लॉग पोस्टद्वारे हा निर्णय जाहीर केला आहे. स्पॉटिफाय प्लॅटफॉर्म सुमारे १,५०० कर्मचारी किंवा १७ टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकतील. हा मोठा बदल कंपनीचा वाढता तोटा कमी करून तिला फायद्यात आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. स्पॉटिफाय प्लॅटफॉर्मचे सीईओ डॅनियल यांनी ब्लॉग पोस्टमध्ये स्पष्ट केले की, “कंपनी चांगली कामगिरी करत असली तरीही जगाची अर्थव्यवस्था तितकी चांगली नाही आहे. व्यवसाय वाढवण्यासाठी पैसे मिळणे खूप कठीण झाले आहे. यामुळे कंपनीत काम करण्यासाठी किती लोकांची गरज आहे याचा विचार करते आहे आणि १७ टक्क्यांनी कर्मचारी कमी करण्याच्या निर्णयापर्यंत कंपनी पोहचली आहे. पुढे सीईओ म्हणाले, मला माहीत आहे की, ज्यांनी कंपनीला योगदान दिले आहे, अशा अनेक व्यक्तींवर याचा वाईट परिणाम होईल. पण, दुर्दैवाने स्पॉटिफायवर काम करणाऱ्या काही लोकांना त्यांच्या नोकऱ्या सोडाव्या लागतीत; ज्यात हुशार, प्रतिभावान आणि मेहनती व्यक्ती आहेत, ज्यांनी कंपनीसाठी खूप योगदान दिले आहे.

हेही वाचा…टेलिग्रामचा अनुभव होणार अधिक मजेशीर! ‘हे’ शानदार फिचर्स होणार लाँच; जाणून घ्या

नोकरीवरून काढणाऱ्या कर्मचाऱ्यांना स्पॉटिफायकडून मिळणार सुविधा :

नोकरीवरून काढून टाकणाऱ्या कर्मचाऱ्यांची कंपनीकडून काळजी घेतली जाणार आहे. स्पॉटिफाय कर्मचाऱ्यांनी प्लॅटफॉर्मवर किती काळ काम केले याच्या आधारावर कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकल्यानंतर त्यांना पैशांची मदत केली जाईल. कंपनी काही काळ कर्मचाऱ्यांना आरोग्यसेवा देईल. तसेच याव्यतिरिक्त कंपनी कर्मचाऱ्यांना नवीन नोकऱ्या शोधण्यात मदतसुद्धा करेल.

स्पॉटिफायची या वर्षातील ही तिसरी कामगार कपात आहे. म्युझिक स्ट्रिमिंग स्पॉटिफायने जानेवारीमध्ये ६०० कर्मचारी, तर जूनमध्ये २०० कर्मचाऱ्यांना काढून टाकले. त्यानंतर आता पुन्हा सुमारे १५०० कर्मचारी किंवा १७ टक्के कर्मचारी काढून टाकण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Music streaming company spotify announce layoffs ceo says 17 per cent employees to go immediately asp

First published on: 05-12-2023 at 13:19 IST
Next Story
इस्त्रोचं आणखी एक मोठं यश, चंद्राकडे पाठवलेलं यान पृथ्वीपर्यंत परत आणलं, आता अंतराळवीर…