कालच भारतीय कंपनी असणाऱ्या Lava कंपनीने आपला Lava Agni 2 5G लॉन्च केला आहे. तसेच काही दिवसांपूर्वी OnePlus कंपनीने आपला OnePlus Nord CE 3 Lite 5G हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेमध्ये लॉन्च केला आहे. आज आपण या दोन्ही स्मार्टफोनमध्ये कोणता फोन बेस्ट आहे ,त्याचे फीचर्स किंमत काय आहे हे जाणून घेऊयात.

OnePlus Nord CE 3 Lite चे फीचर्स

OnePlus Nord CE 3 Lite या फोनमध्ये वापरकर्त्यांना यामध्ये एलसीडी डिस्प्ले वापरायला मिळणार आहे. ज्याचा रिफ्रेश रेट हा १८०० २४०० पिक्सेल इतका असणार आहे. OnePlus Nord CE 3 Lite ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज या व्हेरिएंटमध्ये लॉन्च झाला आहे. या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 695 5G प्रोसेसर मिळणार आहे.

MS Dhoni Review System as Umpire Gives Wide Ball in CSK vs LSG match IPL 2024
IPL 2024: धोनी रिव्ह्यू सिस्टीम! पंचांचा निर्णय अन् लगेचच माहीचा रिव्ह्यूसाठी इशारा, पाहा काय घडलं?
A girl told the incident of how she got Rs 2 back while buying a ticket in a metro station
तिकीटातील २ रुपये परत केले नाही म्हणून तरुणीने लढवली शक्कल, पुणे मेट्रो स्टेशनवरील व्हिडीओ व्हायरल
Is this waitress serving at a restaurant in China robot or human
रोबोट आहे की तरुणी? चीनी रेस्टॉरंटमधील वेट्रेसची एकच चर्चा, Video पाहून सांगा, तुम्हाला काय वाटते?
an Old uncle and a young boy inside Delhi metro over seat issues
“रात्रभर पोलीस स्टेशनमध्ये…” तरुण अन् वृद्ध व्यक्तीमध्ये पेटला वाद, दिल्ली मेट्रोतील VIDEO होतोय व्हायरल

हेही वाचा : OnePlus च्या ‘या’ स्मार्टफोन खरेदीवर भरघोस डिस्काउंटसह मिळणार ‘हे’ प्रॉडक्ट एकदम मोफत

वापरकर्त्यांना यामध्ये ५००० mAh ची बॅटरी आणि त्याला ६७W चे SuperVOOC फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळणार आहे. या फोनचे एकूण वजन हे १९५ ग्रॅम इतके असणार आहे. नेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये 5G, ब्लूटूथ 5.1, Wi-Fi, GPS, NFC आणि USB टाइप-सी पोर्ट असे फिचर मिळणार आहेत.

Lava Agni 2 चे फीचर्स

Lava च्या या फोनमध्ये तुम्हाला ६.७ इंचाचा डिस्प्ले मिळणार आहे. ज्याचा रिफरेश रेट हा १२० Hz इतका आहे. या फोनचा डिस्प्ले AMOLED असणार आहे. याबाबतचा एक टीझर जारी केला आहे. त्यामध्ये याचा डिस्प्ले हा कर्व्ह आहे. Lava च्या या फोनमध्ये ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी इतके स्टोरेज तुम्हाला मिळणार आहे. याशिवाय यामध्ये तुम्हाला ५००० mAh ची बॅटरी आणि ४४ w चे वायरचे फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळणार आहे. तसेच फोनमध्ये टाइप-सी चा सपोर्ट मिळेल. याशिवाय या लावा फोनमध्ये MediaTek Dimensity 7050 प्रोसेसर मिळणार आहे.

Lava Agni 2 5G या फोनमध्ये चार रिअर कॅमेरे देण्यात आले आहेत. ज्यामध्ये प्रायमरी लेन्स ही ५० मेगापिक्सलची आहे. तसेच सेल्फी आणि व्हीडिओसाठी १६ मेगापिक्सलचा कॅमेरा या फोनमध्ये वापरकर्त्यांना मिळणार आहे.

हेही वाचा : रेल्वे प्रवाशांचा प्रवास आणखी सुखद होणार! लॉन्च झाले ‘हे’ जबरदस्त अ‍ॅप; नेटफ्लिक्ससह मिळणार…

OnePlus Nord CE 3 Lite ची किंमत

OnePlus Nord CE 3 Lite 5G या फोनमधील ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटर्नल स्टोरेज असणाऱ्या व्हेरिएंटची किंमत २१,९९९ रुपये इतकी आहे. तर ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी इंस्ट्रल स्टोरेज असणाऱ्या व्हेरिएंटची किंमत २१,९९९ रुपये इतकी आहे. हा फोन तुम्ही Chromatic Gray आणि Pastel Lime या रंगांमध्ये खरेदी करू शकता. 

Lava Agni 2 5G  ची किंमत

Lava Agni 2 5G हा स्मार्टफोन २४ मे पासून Amazon वर खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. याची किंमत कंपनीने २१,९९९ रुपये ठेवली आहे. परंतु ग्राहकांना सर्व प्रमुख डेबिट आणि क्रेडिट कार्डवर २,००० रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे. डिस्काउंटमुळे त्याची किंमत १९,९९९ रुपये होईल.