ओप्पो ही एक लोकप्रिय मोबाइल उत्पादक कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन स्मार्टफोन्स लॉन्च करत असते. ओप्पो आपल्या ग्राहकांसाठी उद्या म्हणजे १२ ऑक्टोबर रोजी ओप्पो Find N3 Flip हा स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. मात्र हा स्मार्टफोन लॉन्च होण्यापूर्वीच याच्या किंमती लीक झाल्या आहेत. हा स्मार्टफोन ऑगस्टमध्ये चीनमध्ये लॉन्च करण्यात आला होता. कंपनीने या फोनमध्ये मिडियाटेक डायमेन्सिटी 9200 SoC प्रोसेसरचा सपोर्ट दिला आहे. या फोनचे फीचर्स आणि लीक झालेल्या किंमतीविषयी जाणून घेऊयात.

ओप्पो Find N3 Flip मागील ऑगस्टमध्ये १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंटसह चीनमध्ये CNY ६,७९९ (अंदाजे ७७,००० रुपये )या किंमतीत लॉन्च करण्यात आले होते. हा फोन मिरर नाइट, मिस्ट रोझ, मुनलाइट म्यूज या रंगांमध्ये उपलब्ध केला जाऊ शकतो. भारतात उद्या लॉन्च केले जाणाऱ्या स्मार्टफोनमध्ये चीनमधील फोप्रमाणेच स्पेसिफिकेशन्स असण्याची शक्यता आहे. ओप्पो Find N3 Flip च्या चीनमधील मॉडेलमध्ये ६.८० इंचाचा AMOLED डिस्प्ले मिळू शकतो. ज्याचा रिफ्रेश रेट हा १२० Hz इतका असू शकतो. तसेच यामध्ये ३.२६ इंचाचा कव्हर डिस्प्ले मिळू शकतो. याबाबतचे वृत्त gadgets360 ने दिले आहे.

WhatsApp Soon Allow Users To update With privately mention contacts in status updates maintaining user privacy
व्हॉट्सॲपच्या स्टेटसमध्ये इन्स्टाग्राम फीचर; फोटो, व्हिडीओ टाकताना मिळणार ‘ही’ खास सोय; ‘असा’ करा वापर
Air India Air Transport Services Limited jobs 2024
AIATSL recruitment 2024 : एअर इंडिया एअर ट्रान्स्पोर्ट सर्व्हिसेसमध्ये मोठी भरती; पाहा नोकरीची माहिती….
restaurant inside metro coach nmrc introduces unique metro coach restaurant at sector 137 station know seating capacity read all details
आता मेट्रोमध्ये करु शकता पार्टी अन् मीटिंग; ‘या’ ठिकाणी सुरू होतेय मेट्रो कोच रेस्टॉरंट
Video Hardik Pandya Trolled Again For Praying At Gujarat Somnath Temple
Video: शेवटचा पर्याय ‘तोच’! हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सच्या सलग तीन पराभवानंतर पोहोचला गुजरातला अन्..

हेही वाचा : ‘राष्ट्रीय चित्रपट दिना’निमित्त केवळ ९९ रूपयांमध्ये पाहता येणार चित्रपट; कुठे करता येणार बुकिंग? जाणून घ्या

तसेच या फोनमध्ये मिडियाटेक डायमेन्सिटी 9200 SoC प्रोसेसरचा सपोर्ट दिला जाऊ शकतो. यामध्ये १२ जीबी रॅम आणि ५१२ जीबी इनबिल्ट स्टोरेज मिळू शकतो. तसेच या फोनच्या कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये OIS स्पोर्टसह ५० मेगापिक्सलचा सोनी IMX890 चा प्रायमरी सेन्सर, ४८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि ३२ मेगापिक्सलचा टेलीफोटो सेन्सर मिळू शकतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो. तसेच या फोनमध्ये अलर्ट स्लायडर आणि ४४ W वायर्ड चार्जिंग सपोर्ट आणि ४,३०० mAh क्षमतेची बॅटरी मिळू शकते.

टिपस्टर अभिषेक यादव (@yabhishekhd) यांनी (@LeaksAn1) च्या माध्यमातून एक्सवर ओप्पो Find N3 Flip स्मार्टफोनच्या भारतातील किंमतीबद्दल माहिती सांगितली आहे. टिपस्टर अभिषेक यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, ओप्पो Find N3 Flip च्या १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ९४,९९९ रुपये असू शकते. कंपनी कदाचित हा फोन भारतात सवलतींसह ८९,६६२ रुपयांमध्ये उपलब्ध करू शकते.