बहुप्रतिक्षित Oppo चा फोल्डेबल फोन Oppo Find N3 फ्लिप हा बाजारपेठेत दाखल झाला आहे. फोल्डेबल फोनची वाढती मागणी पाहता ओप्पोनेही त्यांचा फोल्डेबल स्मार्टफोन दाखल केला आहे. ओप्पो ही एक लोकप्रिय मोबाईल उत्पादक कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन स्मार्टफोन्स लाँच करत असते आणि ग्राहकही Oppo च्या स्मार्टफोन्सला खूप पसंत करत असतात. या स्मार्टफोनची स्पर्धा थेट Samsung Galaxy N3 Flip शी होईल, असे मानले जात आहे.

Oppo Find N3 Flip स्मार्टफोनमध्ये काय आहे खास

कंपनीने Oppo Find N3 Flip हे ट्रिपल कॅमेरा सेटअप आणि दोन रंगांमध्ये लाँच केले आहे. Oppo Find N3 Flip मध्ये, तुम्हाला १२०Hz च्या रिफ्रेश रेटसह ३.२६ इंच बाह्य डिस्प्ले आणि ६.८ इंच FHD Plus मुख्य डिस्प्ले मिळेल. Android 13 सह ColorOS १३.२ आणि ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे ज्यामध्ये ५०MP वाइड अँगल कॅमेरा, ४८MP अल्ट्रावाइड कॅमेरा आणि ४८MP पोर्ट्रेट कॅमेरा आहे. तुम्हाला सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी ३२MP कॅमेरा मिळेल. Oppo Find N3 Flip मध्ये, तुम्हाला ४४ Watt फास्ट चार्जिंगसह ४३०० mAh बॅटरी मिळेल.

Horizon investment of thousand crores in Chakan
होरायझनची चाकणमध्ये हजार कोटींची गुंतवणूक
Pune model of co-working space From start-ups to large companies everyone is getting preference
को- वर्किंग स्पेसचे पुणेरी मॉडेल! स्टार्टअपपासून मोठ्या कंपन्यांपर्यंत सर्वांचीच मिळतेय पसंती
During the financial year the market value of 80 companies exceeded lakhs of crores
सरलेल्या आर्थिक वर्षात ८० कंपन्यांचे बाजारमूल्य लाख कोटींपुढे
Hero MotoCorp sales
बाकी कंपन्यांची उडाली झोप, Hero ची बाजारपेठेत ‘हिरोगीरी’; विक्रीत मोठी वाढ, बाईक खरेदीसाठी ग्राहकांच्या मोठ्या रांगा

(हे ही वाचा : iPhone च्या ‘या’ मॉडेलवर मिळतोय तब्बल २५,६०० रूपयांचा डिस्काउंट, Flipkart वर सुरू आहे बेस्ट डील )

किंमत

Oppo चा नवा स्मार्टफोन Oppo Find N3 Flip तुम्ही ते फ्लिपकार्टद्वारे बुक करू शकता. स्मार्टफोनच्या १२GB रॅम आणि २५६GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ९४,९९९ रुपये असली तरी सध्या सुरू असलेल्या फेस्टिव्हल सेलमध्ये या स्मार्टफोनवर सूट दिली जात आहे. स्मार्टफोनवर तुम्ही १२,००० रुपयांपर्यंत बचत करू शकता.

तुम्ही Axis, ICICI, Kotak Mahindra आणि Flipkart Axis बँक डेबिट आणि क्रेडिट कार्डद्वारे Oppo Find N3 फ्लिप खरेदी केल्यास, तुम्हाला ६,००० रुपयांची सूट मिळेल. कंपनी निवडक बँक कार्डवर १२,००० रुपयांची सूट देखील देत आहे. तुम्ही स्लीक ब्लॅक आणि क्रीम गोल्ड कलरमध्ये फोन खरेदी करू शकता. स्मार्टफोनची पहिली विक्री २२ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे.