आपली अनेक कामे हल्ली स्मार्टफोनच्या मदतीने होतात. आपण आपले बजेट आणि आपल्याला हवे असणारे फीचर्स ज्यामध्ये असतील त्या कंपनीचा स्मार्टफोन खरेदी करत असतो. फीचर्समध्ये आपण स्टोरेज, आणि कॅमेरा तसेच बॅटरी यांचा परफॉर्मन्स तपासात असतो. अनेक कंपन्यांच्या फोनची तुलना आपण करतो आणि मगच कोणता फोन घ्यायचा हे ठरवतो. मात्र नुकताच Honor ने आपला honor ९० ५जी आणि विवोने V29 स्मार्टफोन लॉन्च केला आहे. आज आपण या दोन्ही स्मार्टफोनमध्ये कोणता फोन बेस्ट आहे ,त्याचे फीचर्स किंमत काय आहे हे पाहणार आहोत.

Honor 90 5G : फीचर्स

honor च्या या नवीन फोनमध्ये वापरकर्त्यांना ६.७ इंचाचा AMOLED डिस्प्ले मिळणार आहे. याचे रिझोल्युशन हे १.५ के इतके आहे. तर याचा रिफ्रेश रेट हा १२० Hz इतका आहे. या फोनला Qualcomm स्नॅपड्रॅगन 7 Gen 1 SoC सपोर्ट येतो. ज्यात १२८ जीबी LPDDR5 रॅम आणि २५६ जीबी इतके UFS 3.1 इनबिल्ट स्टोरेजसह जोडण्यात आपले आहे. हा फोन अँड्रॉइड १३ आधारित OS ७.१ वर चालतो. 

WhatsApp Soon Allow Users To update With privately mention contacts in status updates maintaining user privacy
व्हॉट्सॲपच्या स्टेटसमध्ये इन्स्टाग्राम फीचर; फोटो, व्हिडीओ टाकताना मिळणार ‘ही’ खास सोय; ‘असा’ करा वापर
nestle India shares slip after reports says baby food contain high levels of added sugar
नेस्लेला ८,१३७ कोटी बाजार भांडवलाची झळ; दुग्धजन्य पदार्थांबाबतच्या वृत्ताने भांडवली बाजारात समभागात घसरण
cryptocurrency fraud marathi news
क्रिप्टो करंन्सीच्या नावावर युवकाने गमावले २३ लाख रुपये
Loksatta kutuhal Artificial Neural Networks Perceptrons Machine learning
कुतूहल: कृत्रिम चेतापेशींचे जाळे

हेही वाचा : फोटोग्राफर्ससाठी खुशखबर! २०० मेगापिक्सलच्या जबरदस्त कॅमेऱ्यासह Honor चा ‘हा’ स्मार्टफोन भारतात लॉन्च

विवो V29: फीचर्स

विवो V29 हा फोन हिमालयीन ब्ल्यू, मॅजेस्टिक रेड आई स्पेस ब्लॅक या तीन रंगांमध्ये ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. या फोनमध्ये स्लिक डिझाइन देण्यात आले आहे. तसेच या फोनमध्ये कर्व्ह स्क्रीन मिळणार आहे. यामुळे फोनला प्रीमियम लूक प्राप्त होतो. या फोनमध्ये तीन कॅमेरा लेन्स एक एलईडी फ्लॅश आणि स्मार्ट Aura लाइट असणारा एक कॅमेरा मिळणार आहे.

Honor 90 5G : कॅमेरा आणि स्पेसिफिकेशन्स

honor ९० ५जी स्मार्टफोनमध्ये २०० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा मिळणार आहे. तसेच अल्ट्रा वाइड अँगलसह १२ मेगापिक्सलचा सेन्सर आणि LED फ्लॅश युनिटसह २ मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स देखील या सेटअपमध्ये मिळते. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी ५० मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा वापरकर्त्यांना मिळणार आहे. या फोनमध्ये वापरकर्त्यांना ५००० mAh क्षमतेची बॅटरी मिळणार आहे. यासाठी यामध्ये ६६W चा चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. सुरक्षेसाठी यात फोन फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. तसेच कनेक्टिव्हिटीसाठी 5G, 4G LTE, ड्युअल-बँड वाय-फाय, ब्लूटूथ 5.2, NFC, GPS आणि USB टाइप-सी अशी फीचर्स यात मिळतात.

विवो V29: कॅमेरा आणि स्पेसिफिकेशन्स

विवोच्या V29 या फोनमध्ये ७.७८ इंचाचा कर्व्ह AMOLED HDR 10+ डिस्प्ले मिळणार आहे. याचा रिफ्रेश रेट हा १२० Hz इतका असणार आहे. तसेच यामध्ये स्नॅपड्रॅगन 778G चिपसेटचा सपोर्ट मिळणार आहे. V29 मध्ये OIS सह ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेऱ्यासह ८ मेगापिक्सलचा वाइड अँगल शूटर आणि २ मेगापिक्सलचा बोकेह लेन्स मिळते. सेल्फी आणि व्हिडिओसाठी ५० मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. तसेच ४६०० mAh क्षमतेची बॅटरी मिळते. हा फोन १८ मिनिटांमध्ये ० ते ५० टक्के चार्ज होऊ शकतो असा कंपनीचा दावा आहे.

हेही वाचा : VIDEO: Vivo ने लॉन्च केले १८ मिनिटांमध्ये ५० टक्के चार्ज होणारे स्मार्टफोन्स; ५० मेगापिक्सलच्या कॅमेऱ्यासह मिळणार…, एकदा पाहाच

Honor 90 5G : किंमत

भारतात Honor 90 5G हा फोन दोन व्हेरिएंटमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. ८/२५६ जीबी व्हेरिएंटची किंमत ३७,९९९ रुपये आहे. तर १२/५१२ जीबी व्हेरिएंटची किंमत ३९,९९९ रुपये आहे. 

विवो V29: किंमत

V29 हा स्मार्टफोन ८ जीबी रॅम व १२८ जीबी स्टोरेज आणि १२ जीबी रॅम व २५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंटमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. १२८ जीबी स्टोरेज असणाऱ्या व्हेरिएंटची किंमत ३२,९९९ रुपये आणि २५६ जीबी स्टोरेज असणाऱ्या व्हेरिएंटची किंमत ३६,९९९ रुपये इतकी आहे.