वोडाफोन-आयडिया ही देशातील सर्वात मोठी तिसऱ्या क्रमांकांची टेलिकॉम कंपनी आहे. वोडाफोन-आयडिया कंपनीला देशभरात अजून आपले ५ जी नेटवर्क सुरु करता आलेले नाही. लवकरच ते ५ जी नेटवर्क लॉन्च होण्याची शक्यता आहे. कंपनी आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन रिचार्ज प्लॅन लॉन्च करत असते. ज्यात ग्राहकांना अनेक प्रकारचे फायदे मिळतात. व्हीआय अनेक प्रीपेड प्लॅन्स लॉन्च करते. व्हीआयकडे खाजगी दूरसंचार कंपन्यांमध्ये उद्योगातील सर्वात स्वस्त प्रीपेड टॅरिफ प्लॅन आहे. व्हीआयकडे सध्या पोर्टफोलिओमध्ये चार प्रीपेड प्लॅन्स आहेत जे वैधतेसाठी आहेत. या चार प्लॅन्सची किंमत अनुक्रमे ९९, २०४, १९८ आणि १२८ रुपये अशी आहे. या प्लॅन्समध्ये मिळणारे फायदे जाणून घेऊयात. व्होडाफोन आयडियाचे व्हॅलिडिटी प्रीपेड प्लॅन्स वोडाफोन आयडियाकडे सर्वात स्वस्त असा ९९ रुपयांचा प्रीपेड प्लॅन आहे. ज्यात वापरकर्त्यांना १५ किंवा २८ दिवसांची वैधता मिळते. ही वैधता तुम्ही कोणत्या कक्षेत्रात आहे त्यावर ठरते. याशिवाय या प्लॅनमध्ये २०० एमबी डेटासह ९९ रुपयांचा टॉकटाइम देखील मिळतो. तसेच कॉलवर २.५ प्रति पैसे इतके शुल्क लागते. या प्लॅनमध्ये कोणतीही एसएमएस सुविधा मिळत नाही. याबाबतचे वृत्त telecomtalk ने दिले आहे. हेही वाचा : Amazon Great Indian Festival Sale: १० ऑक्टोबरपासून सुरू होणार सेल; ‘या’ प्रॉडक्ट्सवर मिळणार आकर्षक ऑफर्स, VIDEO पाहाच तसेच व्हीआयचा दुसरा प्रीपेड प्लॅन हा १२८ रुपयांचा आहे. हा प्लॅन १० लोकल ऑन नेट नाइट प्लॅनसह येतो. तसेच प्रत्येक कॉलवर २.५ प्रति सेकंड इतके शुल्क लागते. नाइट मिनिट्सचा लाभ वापरकर्त्यांना रात्री ११ ते सकाळी ६ या वेळेत मिळतो. या प्लॅनची वैधता १८ दिवसांची आहे.तसेच वोडाफोन आयडियाकडे असा प्लॅन आहे ज्यात वापरकर्त्यांना ३० दिवसांची वैधता मिळते. या प्लॅनची किंमत १९८ रुपये अशी आहे. या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना ३० दिवसांसाठी ५०० एमबी डेटा आणि १९८ रुपयांचा टॉकटाइम देखील मिळतो. सर्व कॉल्सवर २.५ रुपये प्रति सेकंद इतके शुल्क आकारले जाते. या चार प्लॅन्समधील शेवटचा प्लॅन हा २०४ रुपयांचा प्लॅन आहे. वोडाफोन-आयडियाच्या या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना ३० दिवसांची वैधता मिळते. सर्व कॉल्सवर २.५ रुपये प्रति सेकंद शुल्क आकारले जाते. या प्लॅनसह कंपनी वापरकर्त्यांना २०४ रुपयांचा टॉकटाइम ऑफर करते. हे सर्व प्लॅन्स वापरकर्त्यांना सिम सुरू ठेवण्यासाठीच प्लॅन्स आहेत. ९९ रुपयांचा प्लॅन हा एअरटेल आणि जिओ वापरकर्त्यांसाठी उपलब्ध नाही आहे.