डेस्कटॉप ऑल इन वन पीसी अलीकडे अनेक घरांमध्ये दिसू लागला आहे. कमीत कमी व्यापली जाणारी जागा हे त्याचे खास वैशिष्टय़. पूर्वीची परिस्थितीही आता बदलली आहे. पूर्वी डेलचे डेस्कटॉप केवळ हाय- फाय किंवा श्रीमंत घरांमध्येच पाहायला मिळायचे. आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. डेल हे नाव सर्वत्र दिसू लागले आहे. आता विंडोज ८ नव्याने बाजारपेठेत आल्यानंतर तर डेलचे पीसी अनेक ठिकाणी दिसायला लागले आहेत. कंपनीने अलीकडेच बाजारात आणला आहे, डेल इन्स्पिरेशन २३३०.
अर्थात याच्या नावातच त्याचे वैशिष्टय़ आहे. हा २३ इंची ऑल इन वन पीसी आहे. एरवीच्या डेस्कटॉप हा बटनांवर चालणारा पीसी नाही तर हा टचस्क्रीन आहे. अर्थात विंडोज ८ची रचनाच टचस्क्रीनसमोर ठेवून करण्यात आली आहे. या पीसीसाठी थर्ड जनरेशन इंटेल आयसेव्हन प्रोसेसर वापरण्यात आला आहे. अद्ययावत प्रोसेसरमुळे त्याच्या वेगात चांगलीच वाढ झाली आहे. या नव्या डेस्कटॉप पीसीमध्ये वेव्ज मॅक्स ऑडिओ थ्री स्पीकर्स सह एचडी ऑडिओचाही समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे संगीत आणि व्हिडिओ याचा आनंद अगदी वेगळ्याप्रकारे लुटता येतो.
भारतीय बाजारपेठेतील किंमत : रु. ४५,९९०/-