News Flash

स्मार्ट चॉईस

विंडोज आणि अँड्रॉइड : टू इन वन टॅब कम पीसी बाजारपेठेत अनेकांच्या आयुष्यात संगणकाची सुरुवात झाली तीच मुळी विंडोज पीसीपासून. आता चाळीशी किंवा पन्नाशीमध्ये असलेल्या पिढीने

| May 24, 2013 02:03 am

स्मार्ट  चॉईस

विंडोज आणि अँड्रॉइड : टू इन वन टॅब कम पीसी बाजारपेठेत
अनेकांच्या आयुष्यात संगणकाची सुरुवात झाली तीच मुळी विंडोज पीसीपासून. आता चाळीशी किंवा पन्नाशीमध्ये असलेल्या पिढीने सर्वप्रथम संगणक हाती घेतला. हीच त्या वेळची तरुण पिढी होती, ज्यांना भविष्य संगणकामध्ये आहे, असे खूप खात्रीपूर्वक वाटत होते. संगणक म्हणजे मायक्रोसॉफ्ट असेच त्यावेळचे समीकरण होते. किंबहुना आजही जगभरातील बहुसंख्य डेस्कटॉप्सवर विंडोज हीच मायक्रोसॉफ्टची ऑपरेटिंग सिस्टिम वापरली जाते. आजही त्याला वेगळा चांगला पर्याय आलेला नाही. नाही म्हणायला मध्यंतरीच्या काळात अ‍ॅपलने चांगली मुसंडी मारत त्यांची उपकरणे खास करून आयफोन, आयपॅड आदी सर्वाधिक उंचीवर नेऊन ठेवली. अगदी त्यांनी बाजारात आणलेल्या डेस्कटॉपसाठी अ‍ॅपलची स्वतची ऑपरेटिंग सिस्टिम वापरण्यात आली होती. अ‍ॅपलचे डेस्कटॉप प्रामुख्याने कलात्मक बाबींसाठी अधिक वापरले जातात. त्यामुळे मोठे स्टुडिओ त्यांचा वापर अधिक करतात. त्यांची किंमतही अधिक असते. त्यामुळे सर्वसामान्यांच्या घरात ते विराजमान झालेले फारच कमी संख्येने दिसतात. सामान्यांच्या घरात असलेल्या डेस्कटॉप्सवर आपल्याला िवडोज एक्सपी किंवा विस्टा अथवा लेटेस्ट पीसी असेल तर मग विंडोज सेव्हन पाहायला मिळते.
पण आता ऑनलाइन अ‍ॅक्सेससाठी काही केवळ डेस्कटॉप पीसींचाच वापर नाही होत. अलीकडेच झालेल्या एका मोठय़ा सर्वेक्षणामध्ये असे लक्षात आले की, डेस्कटॉप पीसीपेक्षा सर्वाधिक प्राधान्य संपूर्ण देशभरात दिले जाते ते मोबाईल उपकरणांना. म्हणजेच मोबाईल, स्मार्टफोन आणि टॅब्लेट पीसी यांच्यावरून इंटरनेट अ‍ॅक्सेसमध्ये मोठी वाढ झाली आहे. केवळ वाढच नव्हे तर आता डेस्कटॉपवरून केल्या जाणाऱ्या इंटरनेट अ‍ॅक्सेसला या मोबाईल उपकरणांनी केव्हाच मागे टाकले आहे.
अगदी सुरुवातीच्या काळात मोबाईल अ‍ॅक्सेस असणाऱ्या उपकरणांमध्ये आयफोन आणि आयपॅड या अ‍ॅपलच्या उपकरणांची संख्या सर्वाधिक होती. मात्र गेल्या दीड ते दोन वर्षांमध्ये चित्र पूर्णपणे पालटले असून गुगलची अँड्रॉइड ही ऑपरेटिंग सिस्टिम जगभरात सर्वाधिक वापरली जाते, असे लक्षात आले आहे. या सर्व घडामोडींमध्ये एक बाब घडलेली कुणालाच फारशी लक्षात आली नाही. ती म्हणजे जगभरातील ट्रेंड असे सांगतो की, घरी असताना डेस्कटॉपवर विंडोज आणि हातातील मोबाईलमध्ये मात्र अँड्रॉइड अशा दोन वेगवेगळ्या ऑपरेटिंग सिस्टिम्स वापरणाऱ्यांची जगभरातील संख्या आता ६० टक्क्य़ांपेक्षा जास्त आहे. या दोन्ही ऑपरेटिंग सिस्टिम्सचा वापर करणाऱ्या कोट्यवधी व्यक्ती आहेत.
आसूस या जगभरातील संगणक विक्रीमध्ये स्वतची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या कंपनीने हीच परिस्थिती नेमकी ध्यानात घेतली आणि असा ‘आखूडिशगी बहुदुधी’ असलेला नवा टॅब्लेट पीसी बाजारात आणला आहे. याचे महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे म्हटले तर तो ऑल इन वन डेस्कटॉप पीसी आहे. आणि त्यातील डिटॅचेबल भाग वेगळा काढला की, तो टॅब्लेट पीसीप्रमाणे काम करतो. याचे दुसरे वैशिष््टय़ म्हणजे यामध्ये लोकांना हव्या असलेल्या अशा विंडोज (अर्थात त्यातील लेटेस्ट म्हणजेच विंडोज आठ) आणि अँड्रॉइड ४.१ अशा दोन ऑपरेटिंग सिस्टिम्स वापरण्यात आल्या आहेत.
आसूस ट्रान्स्फॉर्मर एआयओ या नावाने बाजारपेठेत आणलेल्या या मॉडेलची सध्या बाजारपेठेतील किंमत त रु. ८६,९९९ आहे. या मॉडेलचा डिस्प्ले स्क्रीन १८.४ इंचाचा आहे. त्यात एनव्हीडिआ डेग्रा थ्री क्वाडकोअर प्रोसेसर वापरण्यात आला आहे. तर अँड्रॉइडचे ४.१ हे लेटेस्ट व्हर्जन वापरण्यात आले आहे. घरी किंवा ऑफिसमध्ये असताना तुम्हाला याचा वापर डेस्कटॉप पीसीप्रमाणे किंवा बाहेर असताना प्रवासात त्याचा वापर टॅब्लेटप्रमाणे करता येईल. अशा प्रकारे दोन भिन्न ऑपरेटिंग सिस्टिम असलेला आणि डेस्कटॉप कम टॅब्लेट अशी सोय उपलब्ध करून देणारा हा जगातील पहिलाच अशाप्रकारचा पीसी आहे.
यासाठी वायरलेस रिमोट डेस्कटॉप तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून त्यात डय़ुएल बॅण्ड वाय- फायचा वापर करण्यात आला आहे. मल्टिटच कंट्रोल हे त्याचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्टय़ आहे. याची बॅटरी एकदा चार्ज केल्यानंतर तब्बल पाच तास व्यवस्थित चालते, असा कंपनीचा दावा आहे. तर दोन ऑपरेटिंग सिस्टिममधील बदल किंवा स्वीच ओव्हर करणे सोपे जावे म्हणून त्यासाठी एक खास बटन देण्यात आले आहे. ग्राहकांची वाढती मागणी आणि नव्या गरजा लक्षात ठेवून आसूस ट्रान्स्फॉर्मरची निर्मिती करण्यात आली, अशी माहिती आसूसचे भारतातील प्रमुख विनय शेट्टी यांनी दिली.
भारतीय बाजारपेठेतील किंमत : रु. ८६,९९९/-  

कॅमेरा वापरा स्मार्टफोनच्या सहाय्याने !
सोनी सायबर शॉट डीएससी डब्लूएक्स  ३००
गेल्या दीड ते दोन वर्षांमध्ये डिजिटल कॅमेरा आणि डिजिटल एसएलआर कॅमेरा यांच्यामधील अंतर फार वेगात कमी होत चालले आहे. त्यामुळे सामान्यजनांना कमी किंमतीत चांगले कॅमेरे उपलब्ध झाले आहे. सामान्यजनांना फारशी सेटिंग्ज नको असतात पण काढलेले फोटो मात्र व्यावसायिक छायाचित्रकाराप्रमाणे हवे असतात. आता त्यात दिशेने या सामान्य जनांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी कॅमेरा कंपन्यांनी पावले टाकली आहेत. त्यामुळे त्यांच्या या प्रयत्नांचा एक भाग म्हणून हे सर्व फिक्स्ड लेन्स डिजिटल कॅमेरा आता डिजिटल एसएलआरची क्षमता मिळविण्याच्या बेतात आहेत.
डिजिटल एसएलआरचे महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे त्यांच्या चित्रणाची सुस्पष्टता. त्यावर टिपलेले फोटो अतिशय उत्तम गुणवत्तेचे असतात.त्यांचे पिक्सेल्स आकार मोठा केल्यानंतरही फाटत नाहीत. पूर्वी डिजिटल एसएलआर आणि हे छोटेखानी डिजिटल कॅमेरे यां दोन्हीमध्ये १२ किंवा १६ मेगापिक्सेलचे सेन्सर्स वापरले जायचे. पण दोघांच्याही सुस्पष्टतेमध्ये फरक असायचा. कारण डीएसएलआरमध्ये वापरलेले सेन्सर आकाराने मोठे असायचे. पण आता नव्या कॅमेऱ्यांमध्ये तेच मोठय़ा क्षमतेचे सेन्सर्स वापरण्यास छोटेखानी कॅमेऱ्यांमध्ये सुरुवात करण्यात आली आहे, त्यामुळे त्यांच्या सुस्पष्टतेमध्ये चांगलाच फरक पडला आहे.
याशिवाय डीएसएलआरच्या अनेक क्षमता या कॅमेऱ्यांना मिळवून देण्याचा कंपन्यांचा प्रयत्न आहे. हे सारे अगदी अलीकडे बाजारपेठेत आलेल्या सोनीच्या सायबरशॉट डीएससी डब्लूएक्स ३०० या मॉडेलमध्ये पाहता आणि अनुभवता येते.
या कॅमेऱ्यामध्ये १८.२ मेगापिक्सेलचा एक्समोर आर सेन्सर वापरण्यात आला आहे. याला २० एक्स ऑप्टिकल झूमची जोड देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे फूल एचडी मूव्ही शूट करण्याची याची क्षमता आहे. यामध्ये एका नव्या स्टेडीशॉट सुविधेची जोड देण्यात आली आहे. त्यामुळे फोटो टिपताना हात हलला तरी त्याचा परिणाम चित्रणाच्या सुस्पष्टतेवर होणार नाही. या कॅमेऱ्याला वाय- फाय कनेक्टिव्हिटीही देण्यात आली आहे. सर्वात महत्त्वाची सुविधा म्हणजे डीएसएलआर कॅमेऱ्यांमध्ये एक महत्त्वाची सुविधा असते, त्याचा फायदा त्यांना चित्रणादरम्यान होतो ती सुविधा म्हणजे कॅमेऱ्यापासून दूर जाऊनही त्याचे नियंत्रण करता येते. सोनीने त्यांच्या या डीएससी मॉडेलला तिच सुविधा प्राप्त करून दिली आहे. त्यामुळे हा कॅमेरा वाय- फायच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या स्मार्टफोन किंवा टॅब्लेटला जोडता येईल आणि त्यावरून कॅमेऱ्याचे नियंत्रण करता येईल.
भारतीय बाजारपेठेतील किंमत : रु. १९,९९०/-

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 24, 2013 2:03 am

Web Title: smart choice 4
Next Stories
1 नोकियाच्या आशा उजळल्या..
2 स्मार्ट चॉइस
3 सीपीयूशी कट्टी, डिव्हाईसशी बट्टी!
Just Now!
X