आठ वाहिन्याच पाहता येणाऱ्या कृष्ण-धवल टीव्हीपासून ते आता एचडीपर्यंत येऊन ठेपला होता. एक ते दीड वष्रे टीव्हीचा बाजार एलसीडी, एलईडी, एचडी फार फार तर थ्रीडी तंत्रज्ञानापर्यंत येऊन स्थिरावला होता. पण गेल्या तीन महिन्यांपासून टीव्हीच्या बाजारात पुन्हा उलथापालथ सुरू झाली आणि फोर के यूएचडीने हात वर केला. हे टीव्ही काय आहेत आणि सध्या बाजारात कोणते टीव्ही उपलब्ध आहेत या विषयी आपण जाणून घेऊ या.
अनेकदा घरांमध्ये मोठे टीव्ही घेतले जातात, पण त्यावर चित्र चांगले दिसत नाही. यामुळे मोठा टीव्ही घेऊन फारसा उपयोग होत नाही. यासाठी मग एचडी तंत्रज्ञान विकसित करण्यात आले. एचडी टीव्ही पाहण्यासाठी एचडी सेट टॉप बॉक्सही बाजारात आले. यानंतर फोर केचा जमाना आला. हे फोर के म्हणजे काय तर सध्या आपण वापरत असलेल्या टूके तंत्रज्ञानापेक्षा चौपट चांगल्या पद्धतीने काम करणारे तंत्र. यामध्ये आपल्याला टीव्हीवरील चित्र खूप चांगल्या प्रकारे पाहता येऊ शकते. इतकेच नव्हे तर यावर आपल्याला विविध गेम्सही खूप चांगल्या पद्धतीने खेळता येऊ शकतात. सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या फोर के टीव्हींची माहिती करून घेऊ या.

सोनी ब्रेव्हिया ४के
सोनी या कंपनीने ब्रेव्हिया या आपल्या मालिकेमध्ये ४के टीव्ही बाजारात आणले आहेत. या टीव्हीवर दिसणाऱ्या चित्रांचा आणि आवाजाचा दर्जा अत्याधुनिक आहे. यामधील ब्राइटनेस हा वेगळ्या तंत्रज्ञानाच्या साहय्याने विकसित करण्यात आल्यामुळे यामध्ये आपल्याला कोणत्याही ब्राइटनेसवर चित्र पाहताना डोळ्यांना त्रास होत नाही. इतकेच नव्हे तर विविध अंतरावरून हे चित्र सारखेच दिसते. या टीव्हीमध्ये ‘वेड्ग’ तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. यामुळे कितीही मोठा स्क्रीन घेतला तरी चित्रांचा दर्जा चांगला राहतो. यामध्ये देण्यात आलेल्या स्पीकर्समध्ये बासची क्षमताही खूप चांगली असल्यामुळे आवाज खूप चांगल्या प्रकारे ऐकू येऊ शकतो. टीव्हीला यूएसबी पोर्ट, एचडीएमआय पोर्ट, वाय-फाय जोडणी देण्यात आलेली आहे. सोनीने ४९ इंचांपासूनचे ७९ इंचांचे टीव्ही बाजारात उपलब्ध आहेत. यातील ६५ इंच आणि ८५ इंचांचे टीव्ही सप्टेंबर महिन्यात बाजारात उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
किंमत – १ लाख ७४ हजार ९०० रुपयांपासून पुढे.

व्हिडीओकॉन ४के अल्ट्रा यूएचडी
व्हिडीओकॉन या कंपनीने नुकतेच आपल्या ४के अल्ट्रा यूएचडी टीव्हींची मालिका बाजारात आणली आहे. हे सर्व टीव्ही फ्लॅट पॅनल डिस्प्ले असलेले आहेत. थ्रीडी गेमिंग आणि फेर रीडिंग तंत्रज्ञान ही या टीव्हीची खासीयत ठरली आहे. हा टीव्ही अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीमवर चालणारा असून यामध्ये काही अँड्रॉइड अ‍ॅप्स डाऊनलोड करता येणार आहेत. याशिवाय यामध्ये काही इनबिल्ट थ्रीडी गेम्सही देण्यात आलेले आहेत. या टीव्हीला यूएसबी पोर्ट, एचडीएमआय पोर्ट, वाय-फाय अशा सुविधा देण्यात आल्या आहेत. या टीव्हीसोबत थ्रीडी चष्माही देण्यात येणार आहे. कंपनीने टीव्ही ४० इंचांपासून ते ८५ इंचांपर्यंतचे पाच मॉडेल्स बाजारात आणले आहेत.
किंमत – ९१ हजार रुपयांपासून पुढे

एलजी वेब ओएस टीव्ही
एलजीचाही फोर के टीव्ही बाजारात आला आहे. या टीव्हीमध्ये अल्ट्रा सराऊंडर देण्यात आला आहे. यामध्ये न्यूज, सिनेमा, गाणी अशा विविध कार्यक्रमांसाठी विविध पर्यायांची निवड करण्याची सुविधा देण्यात आली आहे. यामध्ये अ‍ॅडव्हान्स डिस्प्ले पॅनल देण्यात आले आहेत. याशिवाय या टीव्हीमध्ये भारतीय भाषांसह १४ विविध भाषांची सुविधा देण्यात आली आहे. ज्यामुळे टीव्ही वापरण्यास अधिक सोपा जातो. यामध्ये चार स्पीकर देण्यात आले आहेत. टीव्हीला यूएसबी पोर्ट, एचडीएमआय पोर्ट, वाय-फाय जोडणी देण्यात आलेली आहे.
किंमत – एक लाख तीन हजारांपासून पुढे

सॅमसंग ४के
सॅमसंगनेही ४ के टीव्ही बाजारात आणले आहेत. या टीव्हीला स्मार्ट थ्रीडी, ४ के अल्ट्रा एचडी स्मार्ट एलईडी टीव्ही असे संबोधिले जाते. या कंपनीने ४० इंचांचे टीव्ही बाजारात आणले आहेत. यात किमान पिक्सेल हे ३८४० गुणिले २१६० पिक्सेल इतके आहे. यात क्वाडमॅटिक इंजिन जोडण्यात आले आहे. यामुळे टीव्हीचे आयुष्य वाढण्यास मदत होते. टीव्हीला यूएसबी पोर्ट, एचडीएमआय पोर्ट, वाय-फाय जोडणी देण्यात आलेली आहे.
किंमत – ८४ हजारांपासून पुढे.