शालेय विद्यार्थी असोत किंवा महाविद्यालयीन सर्वाना संगणकीय गेम्सविषयीचे आकर्षण अद्याप कायम आहे. मोबाइलवर गेम्स आल्याने हे आकर्षण कमी हाईल असे चित्र होते पण प्रत्यक्षात तसे झालेले नाही. बाजारात सातत्याने नवनवीन गेम्स येत आहेत इतकेच नव्हे तर त्यांना चांगली मागणीही उपलब्ध आहे. खास गेम खेळण्यासाठी कन्सोल्स विकत घेणाऱ्यांच्या प्रमाणातही मोठी वाढ झाली आहे.

गॉन होम
तब्बल चार तास चालणाऱ्या या गेममध्येही विविध टाक्स देण्यात आले आहेत. यामध्ये आपल्याला युक्ती प्रयुक्तींचा वापर करून आपल्या घरात पोहचायचे असते. किंमत : १२५० रुपये.

teacher demanded physical relations after seeing student alone in classroom
नागपूर : वर्गात एकट्या विद्यार्थिनीला पाहून शिक्षकाने…
corruption in academic research
संशोधन कमी आणि बाजार जास्त!
Ragging on two postgraduate students at BJ Medical College in Pune print news
धक्कादायक! पुण्यातील बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तरच्या दोन विद्यार्थिनींवर ‘रॅगिंग’
Suicide student
जळगावात परिचारिका महाविद्यालयातील विद्यार्थिनीची आत्महत्या

बायोशॉक इन्फिनिटी
शत्रूच्या तावडीत असलेल्या आपल्या मित्रांना सोडविण्याची गंमत या गेममध्ये अनुभवण्यास मिळते. यामध्ये एकावेळी दोन गन्सचा वापर करता येतो. यामुळे आपण अधिक सक्षम होतो. हा गेम म्हणजे केवळ हाणामारीचा नसून यामध्ये अनेक डोकॅलिटीच्या स्टेप्स देण्यात आल्या आहेत. या गेममध्ये वापरण्यात आलेले लोकेशन्स आणि स्टेप्स अगदी मनमोहक असल्यामुळे गेम अधिकच आकर्षक होतो. किंमत – ७०० रुपये

कंपनी हिरोज २
सुपर हिरोचा हा गेम पण मारामाराची आहे. यामध्ये चांगल्याप्रकारचा गेम प्ले देण्यात आला आहे. यात वापरण्यात आलेले ग्राफिक्स आणि स्टाइल्स हे अत्याधुनिक दर्जाचे असल्यामुळे मुलांना हा गेम विशेष आकर्षित करून घेतो. किंमत : ६९९ ते २४१९ रुपये. विविध ई-रीटेल संकेतस्थळांवरील किंमतींमध्ये फरक आहे.

फिफा १४
फुटबॉल फिव्हर आता परदेशांप्रमाणेच भारतातही चांगलेच दिसू लागले आहे. यामुळे फिफाच्या गेमना मोठी मागणी सुरू झाली आहे. यामध्ये आपल्याला खेळाडू विकत घेण्यापासून ते विविध टीम्सशी खेळण्यापर्यंतचे ऑप्शन्स उपलब्ध आहेत. किंमत : १९३२ ते २४९१ रुपये. विविध ई-रीटेल संकेतस्थळांवरील किंमतींमध्ये फरक आहे.

कॉल ऑफ डय़ुटी: अ‍ॅडव्हान्स वॉरफेअर
या मध्ये आपल्या शत्रूंचा खात्मा करण्यासाठी विविध टास्क देण्यात आलेले आहेत. तसेच त्यासाठी आपल्याला विविध हत्यारेही पुरविण्यात आली आहे. अ‍ॅडव्हान्स वॉरफेअरमध्ये आधीच्या व्हर्जनच्या तुलनेत जास्त अवघड टाक्स देण्यात आले असून यामधील ग्राफिक्सही अधिक मनमोहक करण्यात आली आहेत. या गेमच्या कथानकात काही नवीन पात्रांचाही समावेश करण्यात आला आहे. किंमत – ३७०० रुपये