मुंबई : पूर्व उपनगरातील भांडुप येथील सुषमा स्वराज प्रसूतिगृहामध्ये टॉर्चच्या साहाय्याने प्रसूती केल्याची घटना उघडकीस आली असून सिझेरियनद्वारे प्रसूती करण्यात आलेल्या नवजात अर्भकाचा आणि महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेनंतर महिलेच्या कुटुंबियांनी संताप व्यक्त केला असून, याप्रकरणाची दखल घेत मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने चौकशी समिती स्थापन केली आहे.

हेही वाचा : लोकलमधून पडून तीन महिन्यांत १३९ बळी ; रखडलेले प्रकल्प, मर्यादित फेऱ्यांमुळे जीवघेण्या प्रवासाची वेळ

Yamini Jadhav Shiv Sena Shinde group
तीन वर्षांपूर्वी यामिनी जाधव अपात्र होणार होत्या, आज दक्षिण मुंबईच्या उमेदवार; जाणून घ्या प्रकरण
What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
uddhav thackeray viral video
शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना बाहेर जायला सांगितलं, ठाकरेंनी हात जोडले अन्..; भाजपाने शेअर केला ‘तो’ VIDEO
Woman Strips At Petrol Pump video viral
पेट्रोल पंपावर तरुणीचे लज्जास्पद कृत्य; कर्मचाऱ्यासमोर पँट काढली अन्…; Video व्हायरल
Godrej Family split
१२७ वर्षांपूर्वीच्या गोदरेज ग्रुपचे अखेर विभाजन; भावांमध्ये अशी झाली वाटणी
Prajwal Revanna in Trouble
‘सेक्स व्हिडिओचा तो पेनड्राईव्ह मीच दिला’, रेवण्णाच्या ड्रायव्हरचा धक्कादायक दावा; म्हणाला, “त्यांनी माझ्या बायकोला…”
sanjay raut
“औरंगजेबाप्रमाणे मोदी अन् शाहांच्या महाराष्ट्रावर स्वाऱ्या”; संजय राऊतांची टीका; म्हणाले, “काही भटकते आत्मे…”
dawood bandu khan arrested marathi news
मुंबई: अखेर ४० वर्षांनंतर दाऊदला अटक

भांडुप येथील महानगरपालिकेच्या सुषमा स्वराज प्रसूतिगृहात सोमवारी एका मुस्लिम महिलेला प्रसूतीसाठी दाखल करण्यात आले होते. प्रसूतीदरम्यान अचानक विद्युत प्रवाह खंडीत झाल्याने शस्त्रक्रियागृहात अंधार पसरला. प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेत डॉक्टरांनी टॉर्चच्या प्रकाशझोतामध्ये महिलेची सिझेरियन पद्धतीने प्रसूती केली. मात्र नवजात अर्भकाचा मृत्यू झाला, तर प्रसूतिदरम्यान मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने महिलेची प्रकृती चिंताजनक झाली. त्यामुळे तिला तातडीने शीव रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, शीव रुग्णालयात उपचारादरम्यान महिलेचाही मृत्यू झाला. या घटनेनंतर कुटुंबिय संतप्त झाले. या घटनेचा स्थानिक माजी नगरसेविकेने निषेध करीत मुंबई महानगरपालिकेच्या कारभाराविरोधात संताप व्यक्त केला. या घटनेची दखल घेत मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने चौकशी समिती स्थापन केली.