जीपीएसचा वापर सध्या खूप मोठय़ा प्रमाणावर केला जातो आहे. दुसरीकडे वापर वाढल्याने उत्पादनही वाढले आहे आणि त्याच्या कीमतीही पूर्वीच्या तुलनेमध्ये कमी झाल्या आहेत. तसेच अनेकांनी नावीन्यपूर्ण पद्धतीने त्याचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. या पाश्र्वभूमीवर आता गार्मिनने जीटीयू १० हा जीपीएस लोकेटर बाजारात आणला आहे. हा वजनाने अतिशय हलका असून त्याच्यासोबत कॅराबिनर क्लिप व पाऊचही देण्यात आला आहे. महत्त्वाचे म्हणजे जीपीएसला पाणी लागले की, तो नादुरुस्त होतो आणि मग अनेकदा निकामीही होतो. म्हणूनच गार्मिनने याची रचना करताना तो वॉटरप्रूफ केला आहे. आपल्यासोबत असलेल्या सॅकलाही तो अडकवता येईल किंवा घरी असलेल्या पाळीव प्राण्याच्या पट्टय़ामध्येही.
जीटीयू १० चे लोकेशन किंवा स्थाननिश्चिती ही गार्मिनतर्फेच केली जाते. त्यासाठी वेगवेगळ्या पद्धती वापरण्यात येतात. जीपीएससाठी एक क्षेत्र आपण आरेखन करून त्यांना कळवू शकतो, त्या क्षेत्राबाहेर उपकरण जाते आहे, असे लक्षात आले की, कंपनीला आपण दिलेल्या ई-मेल पत्त्यावर कळविले जाते किंवा मग मोबाईलवर एसएमएसद्वारे माहिती कळविली जाते.  याच्यासाठी लिथियम आयन बॅटरीचा वापर करण्यात आला असून ती तब्बल चार आठवडे सुरू राहू शकते.
भारतीय बाजारपेठेतील किंमत – सुमारे रु. १४,०००/-