मोबाइल अ‍ॅप्स हे आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटक बनले आहेत. सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या अ‍ॅप्सपैकी अनेक अ‍ॅप्स हे आपल्याला खूप उपयुक्त तर ठरतातच याचबरोबर ते खूप लोकप्रियही होतात. पण त्यांच्या या लोकप्रियतेला कोणत्याच व्यासपीठावर सन्मानित केले जात नव्हते. यासाठी थेट गुगलनेच सवरेत्कृष्ट अ‍ॅप्स घोषित करण्याचा निर्णय घेतला. एप्रिल महिन्यात गुगलने या पुरस्कारांसाठीची नामांकने जाहीर करण्यात आली होती. यातून दहा विविध विभागांमध्ये विजेते घोषित करण्यात आले आहेत. जगातील सवरेत्कृष्ट अ‍ॅप घोषित केले असल्यामुळे हे सर्वाच अ‍ॅप भारतीयांसाठी उपयुक्त आहेत असे म्हणता येणार नाही. पाहू या कोणते अ‍ॅप सवरेत्कृष्ट ठरलेत.

सवरेत्कृष्ट खेळ – क्लॅश रॉयल
क्लॅश ऑफ क्लॅन्स या मोबाइल खेळासाठी सुपरसेल या कंपनीची ओळख होती. आता याच कंपनीच्या क्लॅश रायल या खेळाला पुरस्कार मिळाल्याने कंपनीला नवी ओळख मिळाली आहे. या खेळामध्ये दोन खेळाडू आभासी जगात भेटून त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या हुकमी पत्त्याच्या मदतीने तुम्हाला विविध टप्पे गाठायचे असतात. यातून जो कोणी यशस्वी होतो तो जिंकतो. हा खेळ इतर खेळांपेक्षा खूप वेगळा ठरतो. यामुळे याची सवरेत्कृष्ट खेळ म्हणून निवड करण्यात आली आहे.
सवरेत्कृष्ट भौतिक रचना – रॉबीनहूड
अ‍ॅपच्या उपयुक्ततेसोबतच त्याची रचना आणि वापरकर्ता स्नेहीपणाही महत्त्वाचा असतो. यामुळे या विभागातील पुरस्कार महत्त्वाची भूमिका बजावतो. शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात मार्गदर्शन करणाऱ्या या अ‍ॅपला या पुरस्कार देण्यात आला आहे. सध्या अनेक अ‍ॅप्समध्ये भौतिक रचनेचा वापर केला जातो. मात्र पुरस्कार देताना ताजेपणा आणि जास्तीत जास्त भौतिक रचनेचा वापर करणाऱ्या अ‍ॅपचा विचार करण्यात आला. या अ‍ॅपमध्ये वित्तसारखा किचकट विषयही अगदी सोप्या आणि साध्या पद्धतीने मांडण्यात आला आहे.
सवरेत्कृष्ट गुगल प्ले गेम सव्‍‌र्हिस –

टेबल टेनिस टच

तुम्हाला टेबल टेनिस खेळायची इच्छा झाली, मात्र तुमच्यासोबत खेळायला कुणाला वेळ नसेल तर तुम्ही या गेमच्या माध्यमातून तुमची इच्छा पूर्ण करू शकता. हे अ‍ॅप गुगल प्ले गेम सेवेचा फायदा घेऊन विकसित करण्यात आले आहे. यामध्ये त्यावेळी ऑनलाइन उपलब्ध असलेल्या खेळाडूसोबत तुम्ही हा खेळ खेळू शकता. जर अगदीच तुम्हाला कोणी ऑनलाइन दिसले नाही तर तुम्ही संगणकाशीही खेळू शकता.

स्टँडआऊट स्टार्टअप – होपर

हे एक प्रवासी अ‍ॅप आहे. ज्यामध्ये वापरकर्त्यांला विमानाच्या तिकिटांची खरेदी करता येऊ शकते. याची खासियत म्हणजे या अ‍ॅपमध्ये आपण जाऊ इच्छिणाऱ्या मार्गावर कोणत्या विमानसेवा उपलब्ध आहेत आणि त्यांच्या दरांमधील तुलनाही करून मिळते. याचबरोबर आपण ज्या मार्गाचा प्रवास योजिला आहे त्या मार्गासंदर्भातील माहिती देणारे तपशील अ‍ॅपच्या माध्यमातून वापरकर्त्यांला मिळत असतात. यामुळे दर कधी कमी होतात किंवा कधी वाढतात हा तपशीलही तुम्हाला मिळू शकतो. आपण ज्या कालावधीसाठी प्रवास मार्गाची निवड करतो त्या मार्गात कमी पैशांत तिकीट कधी मिळते याची माहिती हे अ‍ॅप आपल्याला देते.

स्टँडआऊट इन्डाय – अल्फाबीअर

स्वतंत्र अ‍ॅप विकासक म्हणून या अ‍ॅपला गौरविण्यात आले आहे. हा एक शब्दांचा खेळ असून यामध्ये तुम्हाला शब्दांमधून विविध पातळय़ांवर पोहचून हा खेळ खेळता येतो. यामध्ये वेगवेगळय़ा प्रकारे बीअर्स असतात जे तुम्ही अनलॉक करून गुण कमावू शकता. फक्त एकच काळजी घ्यावी लागते ती म्हणजे तुम्ही जास्तीत जास्त अक्षरांचा वापर करू शकता. ़

सवरेत्कृष्ट कल्पक – एनवायटी व्हीआर
सवरेत्कृष्ट कल्पक अ‍ॅप म्हणून एनवायटी व्हीआर या आभासी जगतात रमविणाऱ्या अ‍ॅपला गौरविण्यात आले आहे. हे अ‍ॅप न्यूयॉर्क टाइम्सचे असून या माध्यमातून विविध ठिकाणच्या बातम्या वाचकांना दिल्या जातात.

गो ग्लोबल – पोकेमॉन शफल मोबाइल
पोकेमॉन हे कार्टून पात्र सर्वाधिक लोकप्रिय आहे. हा पुरस्कार जास्तीत जास्त लोकापर्यंत त्यांच्या भाषांमध्ये पोहचलेल्या अ‍ॅपला दिला जातो. या विभागात ड्रॅगन बॉल झेड डोक्कन बॅटलसारख्या गेम्सचाही समावेश होता. मात्र त्यात पोकेमान हा सर्वात लोकप्रिय असल्याने त्याची निवड करण्यात आली.

अर्ली अडॉप्टर – वर्ल्ड अराऊंड मी
आपल्या आजूबाजूला काय आहे हे शोधण्यासाठी सर्वात सोपे अ‍ॅप म्हणून या अ‍ॅपची ओळख आहे. हे अ‍ॅप वापरताना आपल्याला केवळ अ‍ॅप सुरू करून मोबाइल डोळय़ासमोर न्यायचा आहे. तो एकदा डोळय़ासमोर नेला की आपल्या आसपास किती अंतरावर कोणती गोष्ट आहे याचा तपशील मिळतो. हे अ‍ॅप वायफाय जोडणीवर अधिक चांगल्याप्रकारे काम करू शकते.

सवरेत्कृष्ट फॅमिलिज अ‍ॅप – थिंक रोल्स २
जर तुम्हाला लहान मुलं असतील तर तुम्ही त्यांच्यासह वापरता येईल अशा अ‍ॅपच्या शोधात असतात. यामध्ये थिंक रोल्स २ हे अ‍ॅप सवरेत्कृष्ट ठरले आहे. यामध्ये आपल्या डोळय़ासमोर काही पात्र जात असतात. त्या पात्रांची क्रमवारी या अ‍ॅपमधील गेम खेळताना करावी लागते. बुद्धीला चालना देणारा हा गेम असून तो लहानांपासून मोठय़ापर्यंत सर्वाना उपयुक्त ठरतो.

सवरेत्कृष्ट अ‍ॅप – हाऊझ

सवरेत्कृष्ट अ‍ॅपचा बहुमान घर सजावटीस मदर करणाऱ्या हाऊझ या अ‍ॅपला गेला आहे. या अ‍ॅमपध्ये आपल्याला आपण आपले घर कसे सजवू शकतो याची संकल्पना मिळते. तर याच अ‍ॅपच्या माध्यमातून आपल्याला रचनाकार आणि कंत्राटदार यांना जोडले जाते. यामध्ये आपले खाते तयार होते आणि आपण तेथे जे काही अपलोड करू तो तपशील आपल्या मित्रांशी शेअर करण्याची सोयही यात देण्यात आली आहे.

RBI orders banks to refund excess interest charged to customers
वसूल केलेले जास्तीचे व्याज ग्राहकांना परत करण्याचे बँकांना आदेश; रिझर्व्ह बँकेचा व्याज वसुलीच्या बँकांतील कुप्रथांवर प्रहार

A case has been registered against the girlfriend who killed her boyfriend Nagpur crime news
प्रियकराचा खून करणाऱ्या प्रेयसीवर गुन्हा दाखल; हुडकेश्वर पोलिसांचा प्रकरण दडपण्याचा प्रयत्न?

Golden Jubilee of Mumbai grahak Panchayat fighting for consumer rights
ग्राहकांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या जागल्याचा सुवर्णमहोत्सव…

piyush goyal
कर्तबगारीने ‘तेजांकित’ झालेल्यांचा गौरव!