लोकल ट्रेनमधून प्रवास करत असताना सब-वे सर्फर, कॅण्डीक्रश, टेम्पल रन असे गेम्स खेळणाऱ्यांची प्रचंड गर्दी असते. प्रत्येक जण वेगाशी शर्यत करत आपला प्रवास करत असतो. पण यात एखादा असा असतो तो ‘शब्द’खेळ करत असतो. अर्थात शब्दांचे खेळ खेळत असतो. यामुळे त्याच़ा शब्दसंग्रह वाढण्यास मदत होते. पाहुयात मोबाइलवर असे कोणते खेळ आहेत ज्याचा वापर करून आपण आपला शब्दसंग्रह वाढवू शकतो.

व्होकॅबलरी बिल्डर

what is google wallet app
गूगलचे ‘Google wallet’ नेमके आहे तरी काय? कोणते अँड्रॉइड वापरकर्ते घेऊ शकतात याचा लाभ?
Civil Law in Constitution is equal or same
नागरी कायदा… समान की एकच?
Kitchen jugad video wash clothes with green chilli apply on cloth
Kitchen Jugaad Video: साबणाऐवजी हिरव्या मिरचीने धुवा कपडे; विचित्र उपायाचा चमत्कारिक परिणाम
enforcement directorate contact with apple to check kejriwal s mobile
केजरीवाल यांचा मोबाइल तपासण्यासाठी ‘अ‍ॅपल’शी संपर्क; मद्यधोरण गैरव्यवहारप्रकरणी ईडीचे पुढचे पाऊल  

मगूश या कंपनीने विकसित केलेल्या या अ‍ॅपमध्ये रोज तुम्हाला १२०० शब्दांचा संग्रह वाढवता येणार आहे. यामध्ये आपण लॉगइन केल्यानंतर आपल्याला रोज किमान १२०० शब्दांचे अर्थ, त्याची व्याख्या व त्या शब्दाचा वापर करून जोडणारे वाक्य हा तपशील समजातो. यामध्ये तुम्ही ज्याप्रमाणे एक शब्दाचा अर्थ जाणून घेत जाल तसे तुम्ही एक एक पातळी वर जात राहाल. यात तुम्हाला इंडरमीडिएट आणि अ‍ॅडव्हान्स अशा दोन पातळ्यांवरही जाऊन शब्दसंग्रह जाणून घेता येतो. यामुळे तुम्ही प्राथमिक पातळी पूर्ण केल्यावर तुम्हाला वरच्या पातळीवर जाताना काही टास्क पूर्ण करावे लागतात. ते पूर्ण केल्यावर तुम्ही पुढच्या पातळीवर जाऊ शकता. या अ‍ॅपमध्ये तुम्हाला जीआरई, टोफेल आणि सॅट या परीक्षांसाठी आवश्यक असलेला शब्दसंग्रहही उपलब्ध करून दिला आहे.

जॉनी ग्रामर वर्ड चॅलेंज

शब्द माहिती असून उपयोग होत नाही. त्याचा व्याकरणात कुठे व कसा वापर करावा याचे ज्ञान असणेही आवश्यक असते. यामुळे व्याकरणाची परीक्षा घेणारा व त्याचे ज्ञान उपलब्ध करून देणारा हा गेम आहे. यामध्ये आपल्याला एक वाक्य समोर दिले जाते. त्या वाक्यात एक गाळलेली जाग असते. ती गाळलेली जागा खाली दिलेल्या पर्यायांमधून पर्याय निवडून पूर्ण करावयाची असते. तसेच यातील विविध प्रकारच्या प्रश्नांमधून आपल्याला आपले इंग्रजीचे व्याकरण सुधारणे सोपे जाते. आपल्या समोर असलेले आव्हान पूर्ण करण्यासाठी आपल्याला एक मिनिटाचा अवधी दिला जातो. या अवधीत आपण आपले उत्तर देणे आवश्यक असते. जर उत्तर चुकले तर बरोबर उत्तर काय होते व त्याचे कारण आपल्यासमोर येते.

अ वर्ड अ डे विडगेट

आपल्या फोनच्या होमस्क्रीनवर सुंदर असे छायाचित्र असते. आपल्याला भावणारे असे ते छायाचित्र असते. या छायाचित्रावर आपण अनेक आयकॉन भरून ठेवलेले असतात. यातच रोज एक नवा शब्द आणि त्याचा अर्थ आपल्याला दिसला तर.. हे शक्य आहे. ‘ अ वर्ड अ डे विडगेट’ या अ‍ॅपमुळे. या अ‍ॅपमध्ये आपल्या होमस्क्रीनवर रोज एक शब्द व त्याच अर्थ झळकणार आहे. हा शब्द दिवसभर मोबाइलच्या स्क्रीनवर दिसत राहणार असल्यामुळे तो शब्द सातत्याने दिसत राहतो. यामुळे तो आपल्या डोक्यात पक्का राहू शकतो. याच अ‍ॅपचे आयओएसवरील नाव ‘वर्ड ऑफ द डे विडगेट’ असे आहे.

पॉवर व्होकॅब वर्ड गेम

शब्दांचे आव्हान ज्यांना घ्यायला आवडते त्यांच्यासाठी हा गेम खूप चांगला पर्याय असणार आहे. यामध्ये आपल्याला हे अ‍ॅप असलेल्या इतर खेळाडूंसोबत खेळता येते तसेच अ‍ॅपसोबतही खेळता येते. यामुळेच या अ‍ॅपला शब्दांचे समाज माध्यम असे म्हटले जाते. या अ‍ॅपमध्ये तुमच्यासमोर एक शब्द येतो. त्याला प्रतिशब्द तुम्हाला द्यायचा असतो. त्या शब्दाचा अर्थ, त्याची व्याख्या, त्यावरून वाक्ये आणि शब्दाचा उच्चार आदी तपशील अ‍ॅपमध्ये देण्यात आलेला आहे. जीआई, सॅट आणि टोफेलसारखी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त शब्दसंग्रह करण्यासाठी या अ‍ॅपचा उपयोग होऊ शकतो. याच शब्द शिकण्याबरोबरच, प्रश्नमंजुषा असे पर्यायही आहेत.

तसेच आपल्याला अडलेल्या शब्दाचा अर्थ शोधण्यासाठी डिक्शनरीही देण्यात आली आहे.

सेव्हन लिटिल वर्डस्

हा एक आगळ्या प्रकारचा गेम आहे. यामध्ये आपल्याला सात व्याख्या दिलेल्या असतात. याचबरोबर दोन किंवा तीन अक्षरे लिहिलेल्या टाइल्सही दिलेल्या असतात. या व्याख्यांवरून आपल्याला सात लहान शब्द शोधून काढायचे असतात. कमीत कमी शब्दांत जास्त भावना मांडणारा हा गेम असून यामुळे इंग्रजी भाषेवरील पकड अधिक घट्ट होण्यास मदत होणार आहे.

युव्होकॅब

हे अ‍ॅप जीआरई, सॅट, टोफेलसारख्या स्पर्धा परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एकदम उपयुक्त असे आहे. यामध्ये तुम्हाला एकाच अर्थाचे अनेक शब्द हुडकणे सोपे होणार आहे. यामुळे हे अ‍ॅप इतरांपेक्षा थोडे वेगेळे ठरणारे आहे. यात एका शब्दाला पर्यायी शब्दांचे मोठे भांडार उपलब्ध करून देण्यात आले आहे. एकाच अर्थाने वापरला जाणारा शब्द कोणत्या वाक्यात कशा प्रकारे वापरल्यावर त्याचा अर्थ कसा होतो याचा तपशील या अ‍ॅपमध्ये आपल्याला मिळणार आहे. या अ‍ॅपमध्ये सातत्याने वापरात येणारे तब्बल पाच हजारांहून अधिक शब्द उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

वर्ड विथ फ्रेंड

फेसबुकवरील लोकप्रिय खेळ फार्मविले विकसित करणारी कंपनी झिंगाने हा गेम विकसित केला आहे. आपल्या मित्रांसोबत गप्पा मारत असताना काही वेगळ्या म्हणजे नियमित उपयोगात न येणाऱ्या शब्दांच्या साह्य़ाने माराव्यात अशी यामागची संकल्पना आहे. यामुळे तुम्हाला नवीन शब्द कळतातच. याचबरोबर तुम्ही तुमच्या मित्राशीही जोडलेले राहता. यामध्ये देण्यात आलेले शब्द हे जीआरईमध्ये वापरण्यात येणाऱ्या शब्दांइतकेच अवघड आहेत. यामुळे या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना या अ‍ॅपचा उपयोग होऊ शकणार आहे. हे अ‍ॅप अ‍ॅण्ड्रॉइड, आयओएसबरोबरच विण्डोजवरही उपलब्ध आहे.

वर्ड टू वर्ड

जोडय़ा लावा या प्रश्नाप्रमाणे चालणारा हा गेम आहे. या गेममध्ये तुम्हाला समोरासमोर असे शब्द दिलेले असतात. या शब्दांमध्ये तुम्हाला समानार्थी किंवा विरुद्धार्थी शब्द दिलेले असतात. यामुळे ते हुशारीने पाहून तुम्हाला शब्दांच्या जोडय़ा लावायच्या असतात. यात वाक्प्रचारांचाही समावेश करण्यात आलेला आहे. यामुळे हा खेळ केवळ शब्दांपुरताच मर्यादित न राहता वाक्यांपर्यंत पोहोचतो.

नीरज पंडित –  nirajcpandit

Niraj.pandit@expressindia.com