26 February 2020

News Flash

आईच्या दागिन्यांसाठी चोराशी भिडला चिमुरडा, स्थानिकांच्या मदतीने अटक

मुलाने दाखववेल्या साहसामुळे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे

आईच्या दागिन्यांसाठी मुलगा चोराशी भिडल्याची घटना समोर आली आहे. मुलाने दाखवलेल्या धाडसामुळे चोराला पकडण्यात यश आलं आहे. स्थानिकांच्या मदतीने चोराला पकडून पोलिसांच्या हवाली करण्यात आलं आहे. विरार पश्चिमेला ही घटना घडली आहे. मुलाने दाखववेल्या साहसामुळे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तनिष महाडिक घरी एकटा असताना चोराने संधी साधत त्यांच्या घऱात घुसखोरी केली होती. यावेळी त्याची आई मुलीला सोडण्यासाठी शाळेत गेली होती. चोराने तनिषला धमकावत घरातील दागिने लंपास करण्याचा प्रयत्न केला. पण यावेळी तनिषने धाडस दाखवत चोराला अडवण्याचा प्रयत्न केला.

यावेळी तनिषने केलेला आरडाओरडा ऐकून शेजारी गोळा झाले होते. यादरम्यान त्याची आईही घऱी पोहोचली होती. चोराने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण स्थानिकांनी त्याला अडवलं आणि चांगलाच चोप दिला. पोलीस येईपर्यंत चोराचे हात पाय बांधून ठेवले होते. नंतर चोराला पोलिसांच्या हवाली करण्यात आलं.

First Published on August 21, 2019 5:08 pm

Web Title: a child fights with theif in vasai sgy 87
Next Stories
1 खड्डय़ांमुळे जीवघेणा प्रवास
2 ठाण्यातील समस्यांना माहितीपटांद्वारे वाचा
3 ठाण्यात मराठा मोर्चा, शिवसेना नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक
Just Now!
X