कुंडीमध्ये एखादे फुलझाडाचे रोप लावल्यावर, त्याला फुलं कधी येणार याची वाट आवर्जून बघितली जाते. कळी येणे, ती मोठी होणे, फूल फुलणे या सर्व क्रिया अगदी सहज घडत असतात आणि त्या बघताना आपण त्यात रमतो. मग या फुलावर मधूनच एखादं फुलपाखरू फिरकलं तर? आणखीनच मज्जा!

फुलझाडं-फुलं जशी वेगवेगळ्या प्रकारची असतात, तसंच फुलपाखरांच्या पण अनेक जाती आहेत. जाती म्हणजे त्यांच्या पंखांवरील रंग, पंखांचा आकार यावरून त्यांना ओळखण्यासाठी दिलेली नावं. प्रत्येक राष्ट्राचं जसं ‘राष्ट्रीय फूल’ किंवा ‘राष्ट्रीय पक्षी’ असतो, तसाच राज्याचाही असतो. मात्र ‘राज्याचे फुलपाखरू’ घोषित करणारं महाराष्ट्र हे भारतातील पहिले राज्य आहे. महाराष्ट्रात ‘राज्य फुलपाखरू’ आहे ‘ब्लू मॉरमॉन’. जून २०१५ मधे हे घोषित करण्यात आले. महाराष्ट्राचं ‘राज्य फूल’ आहे ताम्हण किंवा मोठा बोंडारा किंवा इंग्रजीत ‘लॅजिस्ट्रोमिया स्पेशिओसा’.

Health Special, Pregnancy , dohale,
Health Special: गरोदरपणा आणि डोहाळे; किती खावे, काय टाळावे?
Perfect Brush For Healthy Teeth Why Adults Shall Use Kids Tooth Brush
तोंडाची दुर्गंधी कमी करण्यासह ‘या’ फायद्यांसाठी तुम्हीही वापरायला हवा लहान मुलांचा टूथब्रश; डॉक्टर काय सांगतात?
Womens health It is need to understand mentality of pregnant women
स्त्री आरोग्य : काय असतं गर्भवतीच्या मनात?
best ways to kill and repel ants naturally know how to get rid of ants in the kitchen without toxic chemicals
घरात लागल्या मुंग्यांच्या रांगाच रांगा? मग केमिकल नाही तर वापरा किचनमधील ‘हे’ तीन पदार्थ? मुंग्या जातील पळून

फुलपाखरू आपल्या गृहवाटिकेत फिरकण्यासाठी त्याला आवडणारी फुलं आपल्या गृहवाटिकेत असली पाहिजेत. ज्या फुलांमध्ये जास्त मध आहे अशी फुलं त्यांना आवडतात. त्यामुळे ही फुलझाडं आपण गृहवाटिकेसाठी निवडावी. लॅन्टाना म्हणजे घाणेरी हे अगदी सहज येणारं नेहमी फुलणारं फुलझाड आहे आणि घाणेरीची फुलं फुलपाखरांना खूप आवडतात. याचबरोबर पेंटास, व्हर्बाना, अेक्झोरा, कॉसमॉस, अस्टर, साल्व्हीया, झिनिया या फुलांवरही मध घेण्यासाठी फुलपाखरं ताव मारतात.

फुलांमधे मध असलेल्या झाडांकडे फुलं आल्यावर फुलपाखरं फिरकतात, पण फुलपाखरं ज्या झाडांवर तयार होतात म्हणजे वाढतात ही झाडे वेगळी असतात. यांना ‘होस्ट प्लँट’ म्हणतात. फुलपाखराचं आयुष्य ४ अवस्थांमध्ये असतं. १) अंडी २) अळी ३) कोष ४) फुलपाखरू. विविध जातींप्रमाणे प्रत्येक अवस्थेचा कालावधी बदलतो. अंडी सर्वसाधारणपणे पानांच्या मागे किंवा गवताच्या पानांवर किंवा जमिनीवरसुद्धा घातली जातात. अंडय़ाच रूपांतर जेव्हा अळीमधे होतं तेव्हा या अळ्या झाडांची पाने खातात. किंबहुना या अळ्यांना ‘इटिंग मशीन’ असच संबोधलं जातं. लिंबाच्या किंवा कढीलिंबाच्या झाडावरची अनेक पानं एक दिवसात फस्त झालेली आपल्या बघण्यात आली असतील. फुलपाखरांच्या जातीप्रमाणे त्यांची आवड असते त्यामुळे ‘होस्ट प्लँट’ही बदलतं. अळीच रूपांतर कोषात होतं आणि कोषातून हळूच फुलपाखरू बाहेर पडतं. जागेअभावी आपण  ‘होस्ट प्लँट’ लावू शकणार नसलो तरी हाडमोडी किंवा पानफुटी आणि कढीलिंब ही दोन झाडे आपण गृहवाटिकेसाठी निवडू शकतो. कारण फुलपाखरांना उपयोगी असण्याव्यतिरिक्त ती आपल्यालाही उपयोगी आहेत.  आपल्याकडे साधारण गणपती ते दिवाळी या कालावधीत भरपूर फुलपाखरे दिसतात. तेव्हा आपली गृहवाटिका त्यासाठी आतापासूनच आपण सज्ज करूया आणि फुलपाखरांच्या स्वागतासाठी आतुरतेने तयार राहू या.

drnandini.bondale@gmail.com