काम पूर्ण होऊनही गेल्या पाच महिन्यांपासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेले ठाणे रेल्वे स्थानकालगतच्या सॅटीस पुलाजवळील उद्वाहक (लिफ्ट) अखेर शनिवारी खुले होणार आहे. रेल्वे स्थानकातून पुलावर चढणे-उतरणे सोयीचे जावे यासाठी उद्वाहक बसविण्यात आले आहे. मात्र, शुभारंभ सोहळा होत नाही तोवर ते खुले केले जात नसल्याने प्रवाशांमध्ये नाराजीचे तीव्र सूर उमटू लागले होते. ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी हे उद्वाहन परस्पर खुले केले जाईल, असा इशारा मध्यंतरी दिला होता. या पाश्र्वभूमीवर शनिवारी पालकमंत्री एकनाथ िशदे यांच्या हस्ते शुभारंभ सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमासोबत सॅटीसवरील एलईडी दिव्यांचेही उद्घाटन करण्यात येणार आहे. ठाणे रेल्वे स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सॅटीस पुलावर चढ-उतार करण्यासाठी दोन उद्वाहक उभारण्यात आले आहेत. अशा प्रकारे उद्वाहक उभारले जावेत, अशी मागणी प्रवासी संघटनांकडून सातत्याने केली जात होती. या मागणीला उशीरा का होईना प्रतिसाद देत गेल्या वर्षी यासंबंधीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. त्यानंतर उद्वाहकाचे कामही पूर्णत्वास नेण्यात आले. मात्र पाच महिने उलटूनही ही सुविधा प्रवाशांसाठी खुली करण्यात आली नसल्याने संतापाचे वातावरण होते. या संबंधी ‘लोकसत्ता ठाणे’ मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच खडबडून जाग आलेल्या महापालिका प्रशासनाने उद्वाहकांची तांत्रिक तपासणी पूर्ण केली असून ही यंत्रणा प्रवाशांच्या सेवेकरिता खुली करण्यासाठी महापालिकेने लोकार्पण सोहळा जाहीर केला आहे. येत्या १२ डिसेंबरला सायंकाळी ६.३० वाजता हा सोहळा होणार असून त्यानंतर ही यंत्रणा प्रवाशांकरिता खुली होणार आहे.
नवी यंत्रणा वेगवान
’ही वेळकाढू यंत्रणा बाजूला सारून महावितरणने ठाणे येथील गडकरी तसेच मुलुंड येथील नीलमनगर या दोन्ही विभागांतील विद्युत रोहित्राजवळ नव्या मापन यंत्रणा अमलात आणण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती महावितरणचे ठाणे नागरी मंडळाचे अधीक्षक अभियंता कैलास हुमणे यांनी दिली.
’या यंत्रणेमुळे एकाच वेळी सुमारे दोनशे मीटर अंतरावरील मीटरचे मापन करणे सहज शक्य होणार आहे. तसेच कमी वेळेमध्ये मीटरचे मापन होणार असल्याने त्यांची नोंद घेऊन विद्युत देयके लवकर तयार करता येऊ शकतील, असा दावा त्यांनी केला.