लोकसत्ता वार्ताहर

वसई : करोनाकाळात प्लास्टिक वापरात वाढ झाली होती. याविरोधात वसई-विरार पालिकेच्या पथकाने कारवाईस सुरुवात केली असून दुकानदारांकडून आणि भाजी विक्रेत्यांकडून एक टन प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे. गेली दोन वर्षे पालिकेने प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्यांविरोधात कारवाईची मोहीम हाती घेतली होती. त्यात शहरातील कंपन्यांसह दुकानावर छापे टाकण्यात आले होते.  मात्र, करोनाकाळात ही कारवाई थंडावली. त्यामुळे दुकाने, बाजारपेठा आणि भाजी मंडयांमध्ये प्लास्टिक वापराला सुरुवात झाली होती. याविरोधात पालिकेने पुन्हा मोहीम हाती घेतली आहे. साधारणपणे एक टन प्लास्टिकच्या पिशव्या जप्त केल्या. दुकानदारांकडून दहा हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.